कसालच्या तन्मयी भगत हिचे आ. वैभव नाईक यांनी व्यक्तिशः भेट देत शाल व पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन ; स्कॅश क्रिडा प्रकारात राज्यात पाचवी ठरली आहे तन्मयी.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसालच्या तन्मयी भगत हिचे आमदार वैभव नाईक यांनी विशेष अभिनंदन केले. नुकत्याच अमरावती येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये स्क्वॅश खेळ प्रकारात कसाल येथील विद्यार्थिनी कु. तन्मयी संजय भगत हिने राज्यस्तरावर पाचवा क्रमांक प्राप्त केला व तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.
स्क्वॅश खेळात जिल्ह्यातून राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व करणारी तन्मयी पहिली खेळाडू ठरली आहे. त्याबद्दल कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तिच्या निवासस्थानी भेट देत शाल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
यावेळी अवधूत मालणकर, बाळा कांदळकर, डॉ. बालम, अरुण राणे, पांडुरंग गावडे, गणेश मेस्त्री, विठोबा मळगावकर,वडील -संजय भगत,आई -शुभदा भगत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)