ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांनी दुसर्याच्या कामांवर स्वतःच्या श्रेयांचे स्टीकर लावणे बंद करावे : माजी खासदार डाॅ. निलेश राणे.

आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांनी दुसर्याच्या कामांवर स्वतःच्या श्रेयांचे स्टीकर लावणे बंद करावे : माजी खासदार डाॅ. निलेश राणे.

प्रकाशन: 25 Apr 2023 01:22 PM
वाचन संख्या 388

देशातील रिकामटेकड्या लोकनेत्यांच्या यादीत नांव घेतले जाईल असाही लगावला टोला.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा नेते व माजी खासदार डाॅ निलेश राणे यांनी आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांच्या कार्यपध्दतीवर जोरदार टीका केली असून त्यांना ‘श्रेय घेणारे रिकामटेकडे लोकनेते’ बनू नका असा सल्ला दिला आहे. काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अणाव आणि वराड पुलाच्या पहाणीसाठी गेले असता आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांनी संबंधित ठेकेदाराला २० मे पर्यंत काम पूर्ण न केल्यास काळ्या यादीत टाकायच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या त्याबबत माजी खासदार डाॅ निलेश राणे यांनी माध्यमांशी दृकश्राव्य संदेशातून त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

ही वरील दोन्ही कामे २०१४ व २०१७ ला वर्क ऑर्डर अनुसार कार्यान्वित असताना म्हणजेच गेल्या ९ वर्षातील आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांच्या कार्यकालातील असताना ती अजून पूर्ण झाली नव्हती. भाजपाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आपण स्वतः त्याबाबत २ महिन्यांपूर्वीच ठेकेदाराला ‘त्याला समजेल अशा पद्धतीने ‘ काम पूर्ण करायला सांगितले होते व ते काम आता जवळपास ९० ते ९५% पूर्णत्वाकडे असून ही गोष्ट आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांच्या लक्षात आल्यावर केवळ श्रेयवादासाठी काल वराड व अणाव येथे गेले असा आरोप माजी खासदार डाॅ निलेश राणे यांनी केला आहे.

आता गेली ८ ते ९ महिने राज्य सरकार सगळी कामे सक्षमपणे करत असून आतातरी आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांनी स्वतः काहीतरी सकारात्मक करावे अन्यथा देशातील रिकामटेकड्या लोकनेत्यांच्या यादीत त्यांचे नांव घेतले जाईल असा टोला देखिल माजी खासदार डाॅ निलेश राणे यांनी त्यांच्या दृकश्राव्य संदेशातून लगावला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स