ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री प्रशांत कांबळी यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान ; एकाच वेळी ३ ग्रामपंचायतींची सेवा करणारा दुर्मिळ ग्रामसेवकाची घेतली गेली दखल.

श्री प्रशांत कांबळी यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान ; एकाच वेळी ३ ग्रामपंचायतींची सेवा करणारा दुर्मिळ ग्रामसेवकाची घेतली गेली दखल.

प्रकाशन: 25 Apr 2023 12:49 PM
वाचन संख्या 253

मालवण | सुयोग पंडित : गेली १५ वर्षे राजापूर तालुक्यातील एकाच वेळी ३ ग्रामपंचायतचा कारभार समर्थपणे सांभाळणारे व मूळ कलमठ बाजारपेठ येथील श्री प्रशांत प्रमोद कांबळी यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अशी कामगिरी बजावणारे ते दुर्मिळ ग्रामसेवक आहेत. सध्या ते राजापूर तालुक्यातील भू या गांवी कार्यभाग संभाळत आहेत, त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना काल २४ एप्रिलला सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत व पालक मंत्री यांच्या हस्ते आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रधान करण्यात आला . हा पुरस्कार रत्नागिरी जिल्हा परिषद च्या वतीने २०२१ -२२ ह्या वर्षाच्या उत्तम कामगिरीसाठी देण्यात आला .

तसेच सध्या कार्यरत असलेल्या भू या ग्रामपंचायतला संत गाडगेबाबा महाराज स्वच्छता अभियान द्वितीय क्रमांक पुरस्कार देण्यात आला आहे .श्री प्रशांत कांबळी हे आपल्या ग्रामपंचायत मध्ये शासनाचे नविन नवीन उपक्रम राबवत असतात त्यामुळेच पंचक्रोशीतील सर्व नागरिक त्यांचा नेहमीच गौरव करत असतात. या पुरस्कारासाठी सर्व स्तरातून श्री प्रशांत कांबळी यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व कणकवलीत सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे.

श्री.प्रशांत कांबळी हे ज्येष्ठ अभिनेत्री सौ.अक्षता कांबळी यांचे पुतणे देखील असून सौ.अक्षता कांबळी यांनीही वैयक्तीक स्तरावर त्यांचे अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स