ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
जेष्ठ शिवसेना नेते कै.जयवंत परब यांच्या स्मरणार्थ मसुरे प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत वर्षा वॉरियर देवबाग संघाने पटकावले जेतेपद ; रॉयल मालवणी संघ ठरला उपविजेता.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

जेष्ठ शिवसेना नेते कै.जयवंत परब यांच्या स्मरणार्थ मसुरे प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत वर्षा वॉरियर देवबाग संघाने पटकावले जेतेपद ; रॉयल मालवणी संघ ठरला उपविजेता.

प्रकाशन: 24 Apr 2023 05:26 PM
वाचन संख्या 166

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न.

मालवण | सुयोग पंडित : जेष्ठ शिवसेना नेते कै. जयवंत परब यांच्या स्मरणार्थ मसुरे शिवसेनेच्या वतीने मसुरा प्रिमिअर लीग भगवा चषक २०२३ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वर्षा वरिअर्स देवबाग संघ विजेता ठरला तर रॉयल मालवणी संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघांना आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

यावेळी आ. वैभव नाईक म्हणाले की कै. जयवंत परब यांनी शिवसेना पक्षवाढीसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या जाण्याने पक्षात पोकळी निर्माण झाली.मसुरे येथील शिवसैनिकांनी त्यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.मसुरे ग्रामस्थांनी शिवसेनेवर विश्वास दाखविल्याने मसुरे ग्रामपंचायत शिवसेनेकडे आल्यानंतर अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. येत्या काळातही उर्वरित विकास कामे मार्गी लावली जातील असे आमदार वैभव नाईक यांनी आश्वासित केले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ मालवण विधानसभा संपर्कप्रमुख संग्राम प्रभुगावकर,मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,छोटु ठाकुर,मर्डे सरपंच संदीप हडकर,विभाग प्रमुख व उपसरपंच राजेश गांवकर, राजा कोरगांवकर,शिवाजी परब,सचिन पाटकर,राघवेंद्र मुळिक,जगदीश चव्हाण,पंढरीनाथ मसुरकर,अनिल मेस्त्री आदींसह शिवसेना पदाधिकारी व मसुरे येथील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स