मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली ; आजचा दिवस विश्रांतीचा सल्ला.
मुंबई | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आज दिवसभरातले कार्यक्रम रद्द कऱण्यात आले आहेत. संध्याकाळी ४.३० वाजता ‘आनंदाचा शिधा’ वितरणाचा कार्यक्रम होणार आहे त्यात ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमांतून सहभागी होतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत चिंताजनक असे काही नसून हा किरकोळ थकवा आहे पण आजचा दिवस त्यांना सक्तीची विश्रांती घ्यायचा सल्ला डाॅक्टरनी दिला आहे असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)