ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री उत्तरा बावकर कालवश.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री उत्तरा बावकर कालवश.

प्रकाशन: 13 Apr 2023 01:54 PM
वाचन संख्या 265

‘जस्सी जैसी कोई नही’ मालिकेत त्यांची भूमिका ठरली समकालीन ठसा उमटवणारी..!

मालवण | सुयोग पंडित : सुप्रसिद्ध तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या आणि मराठी, हिंदी चित्रपट व मालिकांतील ख्यातनाम अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे काल दीर्घ आजाराने पुणे येथे निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. उत्तरा यांच्या परिवारात त्यांचा एक भाऊ, एक बहीण, वहिनी व भाचा आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या उत्तरा बावकर यांच्या कुटुंबीयांच्या जवळच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

अभिनय व आवाजी अभिनय यावर त्यांची हुकूमत होती. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामात त्यांनी अनेक वर्षे अध्यापनाचे काम केले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे बारकावे शिकलेल्या उत्तरा बावकर यांनी ‘मुख्यमंत्री’मध्ये पद्मावती, ‘मीना गुर्जरी’मध्ये मीना, शेक्सपियरच्या ‘ऑथेलो’मध्ये डेस्डेमोना आणि नाटककार गिरीश कर्नाड यांच्या ‘तुघलक’ नाटकात आईची भूमिका साकारली होती. त्यांनी लोकप्रिय नाटकांमध्ये संस्मरणीय पात्रे साकारली.

गोविंद निहलानी दिग्दर्शित ‘तमस’ या चित्रपटातील अभिनयानंतर उत्तरा बावकर प्रसिद्धीच्या झोतात आली. सुमित्रा भावे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटातही त्यांनी काम केले. याशिवाय त्यांनी उडान, अंतराल, रिश्ते कोरा कागज, नजराना, जस्सी जैसी कोई नहीं आणि जब लव हुआ यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 20
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 325

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स