ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
राॅयल चॅलेंजर बेंगळुरूचे 'के जी एफ' लखनऊ सुपर जायंट्सच्या 'पूरन' समोर हतबल ; लखनऊ सुपर जायंट्चा 'अविश्‍वसनीय' विजय.

राॅयल चॅलेंजर बेंगळुरूचे 'के जी एफ' लखनऊ सुपर जायंट्सच्या 'पूरन' समोर हतबल ; लखनऊ सुपर जायंट्चा 'अविश्‍वसनीय' विजय.

प्रकाशन: 10 Apr 2023 11:34 PM
वाचन संख्या 196

जबरदस्त उत्कंठावर्धक मुकाबल्याचा ‘सुपर अंत;..!’

क्रीडा वृत्त | सुयोग पंडित : आयपीएल २०२३ स्पर्धेत सलग दुसर्या दिवशी आणखीन एक अविश्‍वसनीय विजय पहायला मिळाला.

बेंगरूळूच्या घरच्या मैदानावर खेळताना यजमान राॅयल चॅलेंजर बंगळुरूकडून पहिले ३ फलंदाज कोहली, फाफ डुप्लेसिस आणि मॅक्सवेल ऊर्फ ‘के जी एफ’ यांच्याकडून तडकवलेल्या अर्धशतकांच्या जोरावर बेंगरूळूने २१३ धावांचे लक्ष्य लखनऊ सुपर जायंट्ससमोर ठेवले.

के जी एफ …..अखेर झुंज ठरली अपयशी

या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मार्कस स्टाॅईनीसचे वादळी अर्धशतक (३० चेंडूत ६५ ) आणि नंतर निकलस पूरनचे विक्रमी तूफानी अर्धशतक ( १९ चेंडूत ६२ ) यांच्या मदतीने लखनऊ सुपर जायंट्ने राॅयल चॅलेंजर बंगळुरूला त्यांच्याच मैदानावर मात देऊन धक्का दिला.

लखनौचा कर्णधार के.एल राहुल याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या आरसीबीने २१२ धावा केल्या आणि लखनौसमोर २१३ धावांचे आव्हान ठेवले. दरम्यान, आरसीबीच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या लखनऊच्या विजयात आयुष बडोनीच्या ३० धावाही महत्त्वपूर्ण ठरल्या .

कर्णधार डू प्लेसीस, विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आरसीबीने लखनऊसमोर २१३ धावांचे तगडे आव्हान ठेवले होते. आरसीबीकडून विराट कोहलीने ४४ चेंडूमध्ये ६१ धावा, डू प्लेसीसने ४६ चेंडूमध्ये नाबाद ७९ धावा आणि ग्लेन मॅक्सवेलने २९ चेंडूमध्ये ५९ धावांची खेळी केली. लखनौकडून अमित मिश्राशिवाय एकाही गोलंदाजाला बळी मिळाला नाही. जयदेव उनाडकट आणि आवेश खानची आरसीबीच्या फलंदाजांनी धुलाई केली. उनाडकटने त्याच्या २ षटकांमध्ये २७ धावा दिल्या.

अखेरीस शेवटच्या षटकांत शेवटच्या चेंडूवर १ धावेची गरज ९ बळी गमावून लखनऊ सुपर जायंट्सने पूर्ण केली. बेंगरूळ राॅयल चॅलेंजर तर्फे वेन पार्नेलने ३ बळी मिळवले .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स