ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
सिंधुदुर्ग प्रीमियर लीग  मध्ये एनसीसी नरगोल देवगड संघ अजिंक्य!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मध्ये एनसीसी नरगोल देवगड संघ अजिंक्य!

प्रकाशन: 04 Apr 2023 10:59 PM
वाचन संख्या 46

आम. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस समारंभ

मसुरे | प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड्स सर्कल मुंबईच्या वतीने नेरुळ नवी मुंबई येथे झालेल्या जिल्हा मर्यादित मुंबई एसपीएल  या क्रिकेट स्पर्धेत एनसीसी  नरगोल देवगड संघाने बलाढ्य वरद इलेव्हन सिंधुदुर्ग संघाचा पराभव करत  विजेतेपद पटकावले.  स्वयंभू इलेव्हन ओवळीये आणि कोकण पॅकर्स देवगड या संघाना तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. क्रिकेट सामन्यामध्ये 32 संघ मालकानी बलाढ्य खेळाडू उतरवले होते. बक्षीस वितरण आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. विजेत्या एनसीसी नरगोल संघाला  आयोजन कमिटी तर्फे आकर्षक  चषक व आमदार नितेश राणे  यांच्या सौजन्याने रोख रुपये 30,000 चे बक्षीस देण्यात आले.  उपविजेत्या वरद इलेव्हन संघाला आयोजन कमिटी तर्फे आकर्षक चषक आणि माजी खासदार निलेश राणे  यांच्या सौजन्याने रोख रुपये http://localhost/news/public/uploads/20,000 चे बक्षीस देण्यात आले. तृतीय क्रमांक स्वयंभू इलेव्हन ओवळीये आणि कोकण पॅकर्स देवगड या दोन्ही संघाला डॉ. अमित दुखंडे यांचा सौजन्याने आकर्षक चषक व सौ. वैशाली ताई राणे यांच्या कडून प्रत्येक संघाला रोख रुपये 5,000 बक्षीस देण्यात आले.  मान्यवर दात्यांनी सुद्धा अनेक पारितोषिके दिली.  स्पर्धेचे आयोजन चेतन वि.रासम , अनिल मातेफोड , वसंत परब , दीपक रासम , स्वप्नील तेली , महेश चव्हाण , अमित धुरी यांनी केले. स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण , आमदार नितेश राणे, सौ वैशाली राणे , अमित दुखंडे , विनायक अपराज , दीपक परब , तुकाराम रासम , राजन गावडे , प्रथमेश सावंत आणि इतर मान्यवर मंडळींनी सहकार्य केले. पंच म्हणून मेघशाम होडावडेकर आणि संतोष राऊत यांनी तर सामनाधिकारी  सतीश मणचेकर आणि गुणलेखन तानाजी रासम आणि मंगेश राणे यांनी केले. समालोचन राजा सामंत, वैभव गावडे , सिद्धेस कास्ते, आबा कोचरेकर, मांजरेकर यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स