ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवणच्या प्राथमिक शिक्षक भारती वतीने आजारग्रस्त कु.सुचिता बागवे हिला आर्थिक मदत.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवणच्या प्राथमिक शिक्षक भारती वतीने आजारग्रस्त कु.सुचिता बागवे हिला आर्थिक मदत.

प्रकाशन: 04 Apr 2023 11:25 AM
वाचन संख्या 129

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या श्रावण येथील कु.सुचिता बागवे ही दोन्ही दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याने गंभीर आजारी आहे. तिच्या आजारपणासाठी सुमारे १० लाख अपेक्षित आहे. शिक्षक भारती सदस्य श्रीम.रागिणी ठाकूर व श्री.उमेश बुकशेटवार यांनी मांडलेल्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण यांच्यावतीने सुचिता बागवे हिस तिच्या उपचारांसाठी रुपये २१००० रुपयांची मदत तिचे काका प्रकाश बागवे यांना शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष श्री.संतोष पाताडे व श्रावण सरपंच श्रीम.नम्रता मुद्राळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली.

यावेळी शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष श्री.संतोष कोचरेकर, रागिणी ठाकूर, उमेश बुकशेटवार,कृष्णा कालकुंद्रीकर,गंगाराम पोटघन ,दिनकर शिरवलकर,संतोष आचरेकर,राजेंद्र चौधरी,तुकाराम खिल्लारे व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उमेश श्रावणकर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स