ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पळसंब माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी विद्यमान सरपंच महेश वरक यांना विकासाला खीळ घालायचे केविलवाणे प्रयत्न न करण्याचा दिला सल्ला.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पळसंब माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी विद्यमान सरपंच महेश वरक यांना विकासाला खीळ घालायचे केविलवाणे प्रयत्न न करण्याचा दिला सल्ला.

प्रकाशन: 04 Apr 2023 01:25 PM
वाचन संख्या 387

गांवच्या एकोप्यासाठी धार्मिक कार्यात अडथळा नको म्हणून एकत्रीत निर्णय सरपंच कदाचित् विसरलेत अशीही जोडली पुस्ती.

मालवण | सुयोग पंडित ( मुख्य संपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवचे माजी सरपंच व सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष चंद्रकांत गोलतकर यांनी विद्यमान सरपंच महेश वरक यांना प्रसिद्धी संदेशाद्वारे गांवच्या विकासाबाबतच्या अनेक गोष्टींबद्दल सल्ला दिला आहे.

२०२२- २०२३ पळसंब गांवची ग्रामपंचायत निवडणूक डिसेंबर २०२२ मध्ये जाहीर झाली होती आणि त्याच दरम्यान गावातील सर्वात मोठा समजला जाणारा धार्मिक उत्सव ‘श्री देव डाळपस्वारी’ हा कार्यक्रम मागचे २ महिने आधीच ठरविण्यात आलेला. या महत्त्वाच्या ग्राम श्रद्धेच्या कार्यक्रमाला कोणतीच बाधा येऊ नये म्हणून गावातील ग्रामस्थ जयंती मंदिरात उपस्थित राहुन सर्वपक्षीय बिनविरोध निवड करण्याचे ठरले कार्यक्रमात अडथळा येऊ नये म्हणून सरपंच पद सव्वा दोन सव्वा दोन वर्षे वाटण्यात आले तसेच इतर सर्वपक्षीय सदस्य निवड करत ग्रामपंचायत सर्वपक्षीय बिनविरोध करण्याचा ऐतिहासिक निर्णय पळसंब गावाने घेतला त्यामुळे विद्यमान सरपंचाचे म्हणने ग्रामपंचायत भाजपकडे दिले. जिल्ह्यातील प्रसार माध्यमे तसेच तज्ञ तटस्थ सामाजिक व राजकीय व्यक्तिंकडूनही या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पळसंब गांव, तत्कालीन सरपंच चंद्रकांत गोलतकर व विरोधी गटाचीही प्रशंसा झाली . कुडाळ- मालवण विधानसभा आमदार वैभव नाईक यांनीही त्या निर्णयाचे कुठलाही राजकीय आकस न ठेवता गांवच्या श्रद्धेसाठी घेतलेल्या अभूतपूर्व निर्णयाचे मनापासून स्वागत केले.

दरम्यान पळसंब वरची वाडी येथे ‘प्रोटोकॉल अनुसार’ उपस्थित कुडाळ-मालवण आमदार साहेबांनी रस्त्याच्या भूमीपुजन प्रसंगी उपस्थित सरपंचांना आपण अर्धा रस्ता केला आहेच आता राहिलेला रस्ता आपण पूर्ण करा असे जबाबदार निखळपणे जाहीर स्पष्ट केले आणि भुमीपूजनाचे श्रीफळ वाढविण्याचा आमदार वैभव नाईक यांनी उपसरपंच अविराज परब यांना दिला. विद्यमान सरपंच महेश वरक यांना तेच कदाचित् रुचले नाही. ६ महिन्यांच्या कार्यकाळात एक ही गांवचे विकासात्मक काम करू न शकणारे सरपंच महेश वरक संपूर्ण गांव व ग्रामस्थांसमोर समोर हतबल सध्या झाले असून आमदार वैभव नाईक यांच्यावर बिन बुडाचे आरोप करून ‘अखंड पळसंब ‘ गांवच्या विकासात खीळ आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असून यामुळे पळसंब गांवात होणा-या विकास कामांना खीळ बसणार यात शंका नाहीच पण त्याचवेळी केवळ गांवचा एकोपा टिकावा,शांती व धार्मिक सहकार्य म्हणून शांत असलेले ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक’ वेळ पडल्यास अजून ब-याच गोष्टींचा रहस्यांचा उलगडा करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत असा सूचक इशाराही पळसंब येथील शिवसैनिकांनी दिला आहे असे माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी स्पष्ट केले आहे.

आपणा स्वतःला किंवा आमदार वैभव नाईक अथवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकाही शिवसैनिकाला पद, प्रतिष्ठापेक्षाही पळसंब गांवची प्रगती हीच मनोमन इच्छा असून उगीचच स्वतःकडे लक्ष वेधून वितंडवाड करत आमदार वैभव नाईक यांच्यावर आरोप करु नयेत असा सल्लाही माजी सरपंच व शिवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत गोलतकर यांनी विद्यमान सरपंच महेश वरक यांना दिला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 452

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स