ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कवी उत्तम पवार स्मृतिदिनी रक्तदान शिबीर व गायन पार्टी स्पर्धा ; दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कवी उत्तम पवार स्मृतिदिनी रक्तदान शिबीर व गायन पार्टी स्पर्धा ; दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गचे आयोजन.

प्रकाशन: 03 Apr 2023 03:49 PM
वाचन संख्या 129

महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षाचेही विशेष औचित्य.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेचे संस्थापक तथा कवी उत्तम पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त दर्पण प्रबोधिनी, सिंधुदुर्गतर्फे १० एप्रिलला सायंकाळी ६ वा. कणकवली येथील बुद्धविहारच्या पटांगणावर जिल्हास्तरीय जयभीम गायन पार्टी स्पर्धा आयोजित केली आहे. तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात रक्तदान शिबीर होणार आहे.

१० एप्रिलला सकाळी ८ ते ११ या वेळेत बुद्धविहार येथे होणाऱ्या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तर जयभीम गायन पार्टी स्पर्धेकरिता अनुक्रमे १० हजार रु.(राजेश कदम, भरणी पुरस्कृत), ७ हजार रु.(जयंत तांबे – बोर्डवे पुरस्कृत), ५ हजार रु.( नरेंद्र तांबे- कणकवली पुरस्कृत) व १,१११ रु.ची दोन उत्तेजनार्थ बक्षिसे(दिलीप कदम- भरणी पुरस्कृत) ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दर्पण प्रबोधिनीतर्फे करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी राजेश कदम ९४२३८३२६९२,आनंद तांबे ९६८९१४४६२८, सुनील तांबे ९५४५९०२३००, सुभाष कदम ९२२६३०१३७३, नरेंद्र तांबे ७५८८५८४७९३, विशाल हडकर ९०४९८१३९१६ यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स