वेंगुर्ल्यात स्वातंत्र्यवीर सावरकर सन्मान यात्रेचे आयोजन ; हिंदू धर्माभिमानी मंडळी, वेंगुर्ले यांनी केले वीर सावरकर प्रेमींना उपस्थितीचे आवाहन.
विवेक परब | ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील ‘हिंदू धर्माभिमानी मंडळी’ यांच्या वतीने शनिवारी ८ एप्रिलला संध्याकाळी ५ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा वेंगुर्ला वासियांची ग्रामदेवता श्री देव रामेश्वर मंदिर येथून सुरू होणार असून पुन्हा तेथेच विसर्जित होणार आहे. या विषयासंदर्भात एक नियोजन बैठक १ एप्रिलला संध्याकाळी ५ वाजता श्री देव रवळनाथ मंदिर येथे संपन्न झाली. या बैठकीला वेंगुर्ल्यातील सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते.
विश्व हिंदू परिषदेचे वेंगुर्ला प्रखंड अध्यक्ष अरुण गोगटे, मंत्री आप्पा धोंंड, प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, राजन गिरप, सुषमा खानोलकर, रा.स्व.संघाचे मंदार बागलकर, बाबुराव खवणेकर सर, अमित नाईक, गुरुप्रसाद खानोलकर, महादेव तथा भाऊ केरकर, अजित राऊळ सर, भूषण पेठे, गिरीश फाटक, सचिन वालावलकर, सुनील डुबळे, उमेश येरम, अभी वेंगुर्लेकर, शेखर काणेकर, रविंंद्र शिरसाठ तसेच समस्त हिंदू धर्माभिमानी आणि नरेंद्र महाराज संप्रदायाचे कार्यकर्ते प्रतिनिधी परमानंद करंगुटकर, शेखर राणे, निलेश बोंद्रे व शिवा तारी उपस्थित होते.
सावरकरांवर टीकेची झोड उठवून वातावरण गढूळ करणाऱ्यांच्या अविचारांवर सद्विचारांची तुरटी फिरवण्याच्या व सामाजिक वातावरण पवित्र करण्याच्या दृष्टीने सन्मानयात्रा संपल्यानंतर ६ वाजता श्री देव रामेश्वर मंदिरात हरिभक्त परायण संदीप बुवा माणके, पुणे यांचे अभ्यासपूर्ण कीर्तन होणार असून कीर्तनाचा विषय ‘हिंदुधर्माभिमानी सावरकर’ असा असणार आहे व कीर्तनाच्या समारोपानंतर श्री नरेंद्र महाराज संप्रदायाकडून अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली असून वेंगुर्ला तालुक्यातील सावरकर भक्तांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)