ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगडमध्ये भव्य मिसळ महोत्सवाचे आयोजन ..!

आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगडमध्ये भव्य मिसळ महोत्सवाचे आयोजन ..!

प्रकाशन: 02 Apr 2023 06:30 PM
वाचन संख्या 174

खवय्यांसाठी राज्यातील विविध ठिकाणच्या नामांकित मिसळींच्या चविची अनोखी मेजवानी..!

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड-कणकवली-वैभववाडीचे आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड शहरात रविवारी ६ एप्रिलला देवगड कॉलेज नाका, डॉ. सावंत कंपाउंड येथे भव्य मिसळ महोत्सव भरवण्यात येणार असून कोल्हापूर, पुणे सह राज्यभरातील नामांकित मिसळची चव देवगड वासीय आणि पर्यटक खवय्यांना चाखता येणार आहे. आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ३ वर्षांपूर्वी वैभववाडीत संपन्न झालेल्या मिसळ महोत्सवाला वैभववाडी तालुकवासियांसह जिल्ह्याभरातील खवय्यानी उपस्थिती लावत तुफान प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता देवगडवासीयांसाठी आमदार नितेश राणे १६ एप्रिल रोजी भव्य मिसळ महोत्सव भरवत आहेत.

१६ एप्रिल रोजी दिवसभर चालणाऱ्या या मिसळ महोत्सवात राज्यभरातील नामांकित असे २५ हून जास्त मिसळ स्टॉल्स असणार आहेत. त्यासोबतच सिने कलाकारांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही रसिकांना मिळणार आहे. देवगड हे शहर पर्यटनदृष्ट्या राज्यासह देश – विदेशात पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी आमदार नितेश राणे मागील काही वर्षे अविरत प्रयत्न करत आहेत. सिंधू फिल्म फेस्टिव्हल, देवगड पवनचक्की येथील सी व्ह्यू असलेले मनोवेधक गार्डन, झिप लाईन, वॅक्स म्युझियम, देशातील पहिले कंटेनर थिएटर हे प्रकल्प आमदार नितेश राणेंनी देवगड शहरात राबवल्यामुळे साहजिकच पर्यटकांची पावले देवगडकडे वळू लागली आहेत. सध्या दहावी, बारावी च्या परीक्षा संपल्यामुळे पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. तसेच हापुसचा राजा असलेला देवगड हापूस आंबाही मार्केटमध्ये आला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटक तसेच खवय्यांना चटकदार मिसळची मेजवानी या मिसळ महोत्सवातून मिळणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स