ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
ओरोसच्या शरद कृषी भवनात ७ मे रोजी 'सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे' आयोजन.

ओरोसच्या शरद कृषी भवनात ७ मे रोजी 'सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे' आयोजन.

प्रकाशन: 25 Mar 2023 05:23 PM
वाचन संख्या 356

सामाजिक कार्यकर्ते व सोहळा समिती अध्यक्ष ॲड.नकुल पार्सेकर यांनी इच्छुकांना केले नोंदणीचे आवाहन.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोसच्या कृषी भवनात ७ मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाहाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि या सोहळा समितीचे अध्यक्ष नकुल पार्सेकर यांनी या विषयी माध्यमांद्वारे जाहीर नोंदणीचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ‘४१ क’ अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा सर्व धर्मीय विवाह सोहळा समीती सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्रीमती एम्. एस. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली असून धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक ७ मे रोजी शरद कृषी भवन, सिंधुदुर्ग नगरी ओरस येथे करण्यात आले आहे. विशेषतः विवाह सोहळ्यासाठी जोडपी निवडताना आदिवासी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, शहीद जवान, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची मुले, बेघर, पारधी समाज, अपंग, गरीब व गरजू तसेच मागासवर्गीय मुले व मुली या घटकांचा विचार केला जाणार आहे.

इच्छुक जोडप्यांचे आधारकार्ड, जन्मदाखला वा शाळा सोडल्याचा दाखला व ज्यांचे पालक हयात आहेत त्यांचे संमतीपत्र आवश्यक आहे. या सामाजिक उपक्रमासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे तसेच मदत करु इच्छिणाऱ्यानी व इच्छुक जोडप्यांनी अधिक माहितीसाठी तथा पूर्व नोंदणीसाठी दिनांक २० एप्रिल २०२३ पर्यंत समितीचे कार्यवाह श्री अशोक पाडावे (९८६९२८०५२९)आचरा, ॲड. सौ. पूर्वा ठाकूर, सहसचिव (९५४५४१५२२९)मालवण, खजिनदार श्री एल्. एम्. सावंत (९४०५१५३२५५)राजवाडा, सावंतवाडी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स