ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत साळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गट महिलांना मसाले बनवणे प्रशिक्षण.

कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत साळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गट महिलांना मसाले बनवणे प्रशिक्षण.

प्रकाशन: 25 Mar 2023 06:55 PM
वाचन संख्या 47

बांदा | राकेश परब : गांवातील महिलांना स्वयंरोजगारचे प्रशिक्षण देऊन त्यांना अर्थार्जनाचे साधन उपलब्ध व्हावे या उद्देशाने साळगांव ग्रामपंचायतने १५ वित्त आयोगाअंतर्गत बचत गटातील महिलांसाठी नुकताच जि.प.शाळा साळगांव क्र.३ येथे कोकण कला व शिक्षण विकास संस्थेमार्फत मसाला बनविणे प्रशिक्षण आयोजित केले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्या सौ. तेजस्विनी सावंत, सौ.तृप्ती सावंत (ग्राम. सदस्या) , श्रीम.कांचन नायर (ग्रामसंघ अध्यक्षा) ,प्रियांका शेटीया (प्रशिक्षक) व श्री. समिर शिर्के (समन्वयक-कोकण संस्था) यांच्या उपस्थितीत पार पडले. कोकण संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ३२ महिला या प्रशिक्षणासाठी सहभागी झाल्या. श्री. समिर शिर्के यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व महिलांना प्रशिक्षणाचा उपयोग व्यवसायिक दृष्टीने कसा करता येईल याविषयी मार्गदर्शन केले. सौ. तेजस्विनी सावंत यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या व ग्रामपंचायत मार्फत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. हे प्रशिक्षण पुढील तीन दिवस सुरू राहणार आहे. हे प्रशिक्षण आयोजित करण्यामागे ग्रामपंचायत सरपंच सौ. अनघा दळवी, सौ. सोनिया पांजरी (ग्रामविकास अधिकारी) तसेच उपसरपंच व सर्व सदस्य यांचे महत्त्वाचे सहकार्य मिळाले. उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे कोकण संस्थेचे समन्वयक श्री. समिर शिर्के यांनी आभार मानले व मुख्य प्रशिक्षणाला सुरवात झाली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स