ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
'गुढी ऑफ होप…!' ; मुणगे येथे शालेय विद्यार्थ्यांनी उभारली अनोखी गुढी. ( विशेष )
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

'गुढी ऑफ होप…!' ; मुणगे येथे शालेय विद्यार्थ्यांनी उभारली अनोखी गुढी. ( विशेष )

प्रकाशन: 22 Mar 2023 06:06 PM
वाचन संख्या 348

मसुरे | प्रतिनिधी (विशेष वृत्त ): त्रिपुरा फाऊंडेशन इंडियाच्या माध्यमातून विविध राज्यांमध्ये चालविण्यात येणांऱ्या होप स्टेशनच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील मुणगे गावातील आडवळवाडी होप स्टेशनमध्ये हिंदू नववर्षाचा सण गुढीपाडवा आणि नवीन वर्षाचे स्वागत गुढी उभारून मोठ्या जल्लोषात विद्यार्थ्यांनी केले.

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुलांनी पारंपरिक पोशाख परिधान केला होता. आंब्याची पाने, कडूनिंब, झेंडू – चाफ्याच्या फूलांचे हार, कलश लावून गुढी उभारली होती. पारंपरिक रांगोळी काढण्यात आली होती. शिक्षकांनी गुढी उभारण्याचे महत्व मुलांना सांगितले. त्यानंतर मुलांच्याकडून गुढीची विधिवत पूजा झाली. सर्वच मुले मोठया आनंदात, उत्साहात सहभागी झाली होती. या फाऊंडेशन मार्फत मुणगे येथे नेहमीच सर्व सण-उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरे केले जातात.

नववर्षाच्या स्वागत कार्यक्रम प्रसंगी होपस्टेशनचे कृतिका बोरकर, पूर्वा रासम, रिया रासम, विदित रासम, हितेश नाटेकर, निशांत रासम, रजत रासम, वैष्णवी रासम, देविका रासम, राखी लब्दे, सुहानी लब्दे, शर्वरी लब्दे, कार्तिकी लब्दे, वेदांती पुजारे, हर्षला रूपे, देवांग मेस्त्री, गायत्री मेस्त्री, मेस्त्री हे विद्यार्थी आणि शिक्षिका कु. सुविधा बोरकर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स