ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
अक्कलकोटच्या श्री वटवृक्ष मंदिरात संपन्न झाली पुण्यतिथी महोत्सव पत्रिकेची पूजा ; महेश इंगळेंच्या हस्ते पत्रिका पूजन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

अक्कलकोटच्या श्री वटवृक्ष मंदिरात संपन्न झाली पुण्यतिथी महोत्सव पत्रिकेची पूजा ; महेश इंगळेंच्या हस्ते पत्रिका पूजन.

प्रकाशन: 22 Mar 2023 05:35 PM
वाचन संख्या 206

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हजारो स्वामी भक्तांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन नववर्षानिमित्त नवनवीन संकल्प स्वामींच्या चरणी केले अर्पण .

मसुरे | प्रतिनिधी : श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांचा १४५ वा पुण्यतिथी महोत्सव दिनांक १८ एप्रिल २०२३ रोजी साजरा होत आहे. या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नित्य अनुष्ठान, धर्मसंकीर्तन, भजनसेवा कार्यक्रम पत्रिकेचे पूजन आज बुधवारी सकाळी १०:३० वाजता वटवृक्ष मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते मंदार महाराज पुजारी यांच्या विधिवत मंत्रोच्चारात श्रींच्या चरणी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले. प्रारंभी आज दिवशी गुढी पाडव्यानिमीत्त हिंदू धर्म नूतन वर्षाच्या शुभपर्व आरंभी वटवृक्ष मंदिरात मंदिर समितीचे पुरोहीत मोहनराव पुजारी यांच्या हस्ते पहाटे ५ वा.श्रींची काकड आरती संपन्न झाली. यानंतर मंदार पुजारी यांच्या मंत्रोच्चारात महेश इंगळे यांच्या हस्ते वटवृक्ष मंदिरातील श्रींच्या निर्गुण पादूकांस देवस्थानच्या वतीने अभिषेक करण्यात आला. आज गुढी पाडव्यानिमीत्त वटवृक्ष मंदिरातील मुळ गाभाऱ्यातील श्रींच्या मुर्तीस वस्त्र व अलंकारांनी सजविण्यात आले आहे. सकाळी ११:३० वाजता नैवेद्य आरती प्रसंगी श्रींना गुढी पाडव्याचे गोड महानैवेद्य मंदिर समितीचे पुरोहीत मोहनराव पुजारी यांच्या हस्ते दाखविण्यात आले. नैवेद्य आरतीनंतर पाडव्यानिमीत्त दर्शनाकरीता येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने शीरा प्रसाद वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी सांगितले की गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हजारो स्वामी भक्तांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन नववर्षानिमित्त नवनवीन संकल्प स्वामींच्या चरणी अर्पण केले. सर्व स्वामी भक्तांचे संकल्प सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेतच. सर्व स्वामी भक्तांच्या मनोकामना व संकल्प पूर्णत्वास जावे हीच स्वामी समर्थांच्या चरणी शुभकामना व्यक्त करून सर्वांना गुढीपाडव्याच्या व नुतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मंदिर समितीचे पुजारी मोहन महाराज पुजारी, धर्मादाय उपायुक्त सुनिता कंकणवाडी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, पी.आय.जितेंद्र कोळी, उद्योगपती सचिन किरनळ्ळी, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, दयानंद हिरेमठ, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, प्रा.नागनाथ जेऊरे, रवि कदम, अमर पाटील, श्रीशैल गवंडी, शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, बाळासाहेब घाटगे, संतोष जमगे,
ओंकार पाठक, मनोहर देगांवकर, अरविंद कोकाटे आदींसह मान्यवरांना कार्यक्रम पत्रिकेद्वारे निमंत्रीत करण्यात आले.
याप्रसंगी दीपक जरीपटके, श्रीपाद सरदेशमुख, स्वामीनाथ लोणारी, सिध्दाराम कुंभार, सागर दळवी, खाजप्पा झंपले, प्रसाद सोनार, संतोष पराणे, गिरीश पवार, अविनाश क्षीरसागर, ऋषिकेश लोणारी, सागर गोंडाळ, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, रवि मलवे, संजय पवार, संजय पाठक आदींसह अनेक स्वामीभक्त उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स