कणकवलीत प्राण्यांना 'शुद्ध पाण्यासाठी' ठेवली जाणार ५० जलपात्रे..!
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या पुढाकाराने व डॉ. प्रसाद धुमक यांच्या सहकार्याने संकल्पना ; टु-व्हीलर असोशिएनच्या अध्यक्ष व सर्व सभासदांचा सहकार्यासहीत पुढाकार.
विवेक परब | ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या
कणकवलीतील मोकाट प्राण्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी नगरसेवक सुशांत नाईक यांच्या पुढाकाराने व प्राणीमित्र डॉ. प्रसाद धौमक यांच्या सहकार्याने कणकवली टु-व्हीलर असोशियन यांच्याकडे ५० भांडी तथा जलपात्रे सुपूर्त करण्यात येणार आहेत. यासाठी वॉटर फॉर व्हाईसलेस या संस्थेची मदत होत आहे.
सध्या प्रचंड उष्णता वाढली आहे. जशी मनुष्याला पाण्याची गरज असते तशी प्राण्यांनाही पाण्याची गरज असते. त्यांची तहान भागविणे आपले कर्तव्य आहे. कणकवली शहरात मोकाट जनावरे, प्राणी भटकत असतात. पावसाळ्यात त्यानां कुठेही पाणी उपलब्ध होते. मात्र आताच्या कडाडाच्या उन्हाळ्यात प्राण्यांना पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. प्राण्यांच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन नगरसेवक सुशांत नाईक प्राणीमित्र डॉ.प्रसाद धुमक व वॉटर फॉर व्हाईसलेस या संस्थेची मदत होत आहे. आज ही पाण्याची भांडी टु-व्हीलर असोशियन कणकवली च्या सर्व सभासदांकडे सुपूर्त करण्यात आली. यावेळी अध्यक्ष सलीम शेख, उपाध्यक्ष प्रशांत बाणे, सचिव महेश चिंदरकर खजिनदार पांडुरंग गावडे प्रमुख सल्लागार नितीन तावडे, प्रथमेश परब, संदीप पारकर, किशोर कांबळे, गणेश सावंत, योगेश बाईत, दशरथ चव्हाण,अमोल सावंत, आदी टू-व्हिलर असोशियन कणकवली चे सभासद उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)