तारकर्लीच्या बाल भजन मंडळाचे अनोखे दातृत्व..!
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तारकर्ली येथील ‘बाल भजन मंडळाने’ त्यांच्या शिमगोत्सवातील खेळातून जमलेला निधी अविनाश धुरत या गरजू तरुणाला देऊन अनोखे दातृत्व दाखवले आहे.
बाल भजन मंडळाचे रोहन कांदळगांवकर, नैतीक कांदळगांवकर , सिद्धेश टिकम, निनाद मोंडकर, यज्ञेश केरकर, ईशान सागवेकर, ॠषभ खराडे, हार्दिक टिकम,रोहीत वरक व आशीष चव्हाण या बालकांनी ही सामाजिक मदत दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)