ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवली महापुरुष मित्रमंडळाचा "मांड उत्सव" उत्साहात साजरा
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कणकवली महापुरुष मित्रमंडळाचा "मांड उत्सव" उत्साहात साजरा

प्रकाशन: 21 Mar 2023 02:55 PM
वाचन संख्या 60

नगरसेवक सुशांत नाईक यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन संपन्न

ब्यूरो चिफ/विवेक परब: प्रतीवर्षी प्रमाणे कणकवली महापुरुष मित्रमंडळाचा “मांड उत्सव” उत्सहात संपन्न.कार्यक्रमास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. कुडाळ – नेरुळ येथील रोंबाटाने प्रेक्षकांची मने जिकंत संपुर्ण कार्यक्रमाचे आकर्षक ठरले. कलमठ, कणकवलीतील अनेक मित्रमंडळानी या रोंबाट स्पर्धेत सहभाग घेतला होता. याचे आयोजन महापुरुष मित्रमंडळाने चांगल्या प्रकारे केले होते.

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी महापुरुष मित्रमंडळाच्या मांड उत्सवास शुभेच्छा दिल्या चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या रूढी, परंपरा जोपासण्याचे काम या मित्रमंडळाच्या वतीने होत आहे. तसेच युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी महापुरुष मित्रमंडळाच्या मांड उत्सवास शुभेच्छा दिल्या. दरवर्षी चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन महापुरुष मित्रमंडळाच्या वतीने केले जाते.मंडळाच्या वतीने आपल्या रूढी, परंपरा जोपसण्याचा वसा महापुरुष मित्रमंडळाने जपला आहे.या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, प्रसाद अंधारी, राजू मानकर, तेजस राणे, राजू सापळे, राजू पारकर,निवृत्ती धडाम, प्रद्दूम मुंज,चेतन अंधारी,अनिकेत उचले,दत्ता सापळे,दादा नार्वेकर, बाळू वालावलकर, मंदार सापळे, हर्षद अंधारी, अमित सापळे, प्रसन्न देसाई, सुमित राणे, सोहम वाळके आदी मान्यवर व महापुरुष मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स