ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद देवधर तर सचिवपदी बाळा कदम यांची सर्वानुमते निवड
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद देवधर तर सचिवपदी बाळा कदम यांची सर्वानुमते निवड

प्रकाशन: 21 Mar 2023 02:59 PM
वाचन संख्या 67

संतोष साळसकर | सहसंपादक: किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद देवधर तर सचिवपदी बाळा कदम यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. या समितीची नवीन कार्यकारिणी नेमण्यासंदर्भात नुकतीच बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी नुतन समिती गठीत करण्यात आली.

दरम्यान, उपाध्यक्ष शरद डोंगरे, सह सचिव यशपाल जैतापकर, खजिनदार रविकांत राणे आणि सह खजिनदार प्रवीण तरवडकर यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून संजय सावंत, गणेश मिठबावकर, प्रदीप साखरकर, प्रदीप मिठबावकर आणि इम्रान मुकादम यांना घेण्यात आले आहे. समिती अधिक सक्षम करण्यासाठी किल्ले संवर्धन समिती, युवा समिती, महिला समिती आदी समित्या गठीत करण्यात येणार आहेत. उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रेरणोत्सव समितीच्यावतीने पे अॅन्ड पार्किंग तसेच पर्यटक विसावा केंद्राचे उद्धाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष व सल्लागार राजीव परूळेकर आणि नुतन अध्यक्ष प्रसाद देवधर यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स