ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ओटवणे येथील युवकाचा नेवली दाभील येथील नदित बुडून मृत्यू मासे पकडणे आले युवकांच्या जीवावर
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

ओटवणे येथील युवकाचा नेवली दाभील येथील नदित बुडून मृत्यू मासे पकडणे आले युवकांच्या जीवावर

प्रकाशन: 20 Mar 2023 02:50 PM
वाचन संख्या 64

बांदा /राकेश परब: सावंतवाडी तालुक्यातील नेवली दाभिल येथील आकाचो ( गुनो) येथील नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. जितेंद्र उर्फ राजू उत्तम तारी (वय ३३ रा. ओटवणे,तारीवाडी) असे त्या युवकाचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली. वयस्कर व आजारी आई वडीलाचा एकुलता एक कमवता मुलगा गेल्याने कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. बांदा पोलिसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, नेवली दाभिल येथील (आकाचो गुनो) येथील नदीत सोमवारी दुपारच्या सुमारास  मृत जितेंद्र हा मित्रांसोबत मासे पकडण्यासाठी गेला होता. जितेंद्र हा खोल पाण्यात  मासे पकडण्यास उतरला असता वरचा आला नाही.त्यानंतर  सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचविण्यास मदत केली. मात्र तो कोणाच्याच हाती लागला नाही. यांची माहीती ओटवणे व नातेवाईकांना  व बांदा पोलिसांना देण्यात आली.     ब‍ांदा पोलीसांनी घटना स्थळी येत पर्यंत शोधमोहीम राबवली. सायंकाळी ७ वाजता पोलिस कर्मचारी  बाळकृष्ण गवस यांनी खोल पाण्यात उतरुन मृतदेह बाहेर काढला. बांदा पोलिस निरिक्षक शामराम काळे,उपनिरिक्षक समिर भोसले, पोलिस कर्मचारी विजय जाधव, बाळकृष्ण गवस,मोरजकर यांच्या मदतीने शवविच्छेदनासाठी मृतदेह बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहे.    त्यांच्या पश्चात आई,वडील,विवाहित बहीण,काका,काकी,चुलत भाऊ असा परिवार आहे. मयत जितेंद्र हा हुशार मनमिळाऊ स्वभाव होतो. तो गेली बरीच शिरोडा,वेगुर्ला  येथून मासे आणून ओटवणे परिसरात मासे विक्री करण्याचा व्यवसाय करत होता.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स