ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कोकणात प्रथमच सापडले उभ्या दगडावरील पेट्रोग्लिफ्स्..! ( विशेष वृत्त )
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कोकणात प्रथमच सापडले उभ्या दगडावरील पेट्रोग्लिफ्स्..! ( विशेष वृत्त )

प्रकाशन: 19 Mar 2023 09:19 PM
वाचन संख्या 358

विवेक परब | ब्युरो चीफ आणि संतोष साळसकर (सहसंपादक) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात इतिहास संशोधन मंडळ हे सातत्याने नवनविन इतिहास शोधुन काढण्यात प्रयत्नशिल असते. आजवर अनेक मंदिरे व दुर्मिळ मूर्ती यांच्या वैशिष्ठ्यांचा शोध या इतिहास संशोधन मंडळाने घेतला आहे. या बरोबरच गेल्या दोन वर्षात देवगड तालुक्यातील पंधरा ते वीस गावात शंभरच्या जवळपास नविन कातळचित्रांचा शोध घेऊन त्यांचे दस्तऐवजीकरण करण्यात संशोधन मंडळाने यश मिळवले आहे. साळशी येथील नैसर्गिक व्हाळा लगतच एक प्राचीन पुष्करणी आहे. या भागात नुकतेच सिमेंट काँक्रीटचा बंधारा घालुन धरण बांधण्यात आले. तेव्हा या भागातील वाढलेले जंगल तोडुन साफसफाई करण्यात आली. धरणा लगतच एक दहा-पंधरा फुट उंचीची मोठी धोंड असून या दगडावर काहीतरी लिपी कोरलेली आहे असे वाटल्याने साळशी येथील मुकुंद भटसाळस्कर यांनी इतिहास संशोधन मंडळाच्या धुपकर यांच्या कानावर ही गोष्ट घातली. कोणता तरी शिलालेख सापडलाय हे कळताच तातडीने साळशी मोहीम १७ मार्च रोजी आयोजित करण्यात आली. यावेळी इतिहास संशोधन मंडळाच्या संशोधकांना दोन पेट्रोग्लिफ्स म्हणजेच कातळचित्रे सापडली आहेत. इथे या नैसर्गिक भव्य दगडावर एका बाजुस दगड तासुन सपाट केला आहे. त्यावर दोन प्राणी कोरलेले आहेत.

साळशी इथल्या या कातळचित्रा विषयी अधिक माहीती सांगताना पुरातत्व अभ्यासक श्री. रणजित हिर्लेकर म्हणाले, “आता पर्यंत गेल्या काही वर्षांमधे रत्नागिरी पासून कुडाळ वेंगुर्ल्या पर्यंत दिड हजारहुन अधिक कातळचित्रे अनेक संशोधकांच्या व हौशी अभ्यासकांच्या प्रयत्नातुन उजेडात आली आहेत. ही सर्वच कातळचित्रे जमिनी लगत सपाट कातळावर कोरलेली आहेत. जमिनी लगत सपाट कातळावर कोरलेली कातळचित्रे हे कोकणचे वैशिष्ठ्य आहे. अफगाणिस्थान, गांधार, काश्मीर या भागातील जी कातळचित्रे आढऴतात ती उभ्या दगडांवर कोरलेली आढळतात. अशी उभ्या दगडांवरील कातळचित्रे अपवाद वगळता कोकणात आजवर कुठेही आढळलेली नाहीत. साळशी येथील उभ्या दगडावरील ही अशी दोन कातळचित्रे कोकणातील प्रथमच सापडली आहेत. त्यामुळेच साळशी येथील ही कातळचित्रे विशेषत म्हणावी लागतील.” या कातळचित्रांचा शोध घेण्याच्या या मोहीमेत रणजित हिर्लेकर यांचे सोबत, धुपकर व अजित टाककर हे सहभागी होते. अशा रितीने देवगड तालुक्यातील कातळचित्रांच्या यादीत एक वेगळ्या वैशिष्ठ्यपुर्ण कातळचित्राची भर पडली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स