साळशी माध्यमिक विद्यामंदिरचे माजी मुख्याध्यापक चंद्रकांत दानोळे यांचे निधन.
संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या साळशी येथील माध्यमिक विद्यामंदिर साळशी चे माजी मुख्याध्यापक श्री.चंद्रकांत पारिसा दानोळे यांचे दीर्घ आजाराने शनिवारी ११ मार्चला वयाच्या ६६ व्या वर्षी कोल्हापूर येथे निधन झाले.
श्री दानोळे हे १९८९ पासून माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे सहाय्यक शिक्षक व त्या नंतर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. २०१६ साली ते सेवा निवृत्त झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)