जि.प. शाळा पळसंब क्र. १ आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आर्या कदम प्रथम ; कणकवलीच्या एस.एम.हायस्कूलची विद्यार्थिनी आहे आर्या.
विवेक परब | ब्यूरो चीफ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब क्र. १ मध्ये १४ ते २२ वयोगटामध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली गेली होती. या स्पर्धेत एस.एम. हायस्कूलच्या आर्या किशोर कदम हिने प्रथम क्रमांक तर प्रगत विद्यामंदिर रामगडच्या वैष्णवी नारायण जिकमडे हिने द्विती व ओझर विद्यामंदिरच्या रिया संतोष कांदळगावकर – तृतीय क्रमांक मिळवला.
प्रगत विद्यामंदिर रामगडच्या साक्षी रविंद्र जिकमडे उत्तेजनार्थ- प्रथम, जनता विद्यालय त्रिंबकच्या प्रथमेश राजेंद्र पुजारे उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेमध्ये एकूण १७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेसाठी श्री विनोद कदम, श्री गिरीधर पुजारे, श्रीमती मानसी असरोंडकर, श्री चंद्रकांत गोलतकर, श्री भिकाजी पळसंबकर यांनी बक्षिसे आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप लि यांनी सहभाग घेऊन सर्व विद्यार्थ्यांना वस्तुरुपाने बक्षिसे दिली. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली या स्पर्धेचे परीक्षण श्री नागेश कदम प्राध्यापक, अध्यापक विद्यालय मालवण, श्री धर्मराज धुरत देवगड तसेच वैभवी कसालकर कणकवली यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)