ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कलमठ ग्रामविकास अधिकाऱ्यांचा गावाकडून सत्कार.

कलमठ ग्रामविकास अधिकाऱ्यांचा गावाकडून सत्कार.

प्रकाशन: 03 Aug 2021 10:54 PM
वाचन संख्या 92

कणकवली | उमेश परब : कलमठ गावच्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून चांगले काम केल्या बद्दल ग्रामविकास अधिकारी संजय कवटकर व ग्रामविकास अधिकारी विश्वास पावसकर यांचा कलमठ गावचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते
सुनील नाडकर्णी यांच्या हस्ते कलमठ वासियांच्या वतिने आज सत्कार करून भावी वाटचालिस शुभेच्छा दिल्या. ग्रामविकास अधिकारी संजय कवटकर यानी ३ वर्षे तर विश्वास पावसकर यांनी ४ महीने प्रभारी म्हणून चांगले काम केले होते. कलमठ गाव कोविड काळात अनेक दिवस हॉटस्पॉट मध्ये असताना दोन्ही ग्रामविकास अधिकारी यांनी चांगले काम केल्याने कलमठ गावच्या वतिने कृतज्ञता म्हणून कलमठ
श्री देव काशिकलेश्वर सभागृहात शाल, श्रीफळ आणी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रभारी सरपंच वैदेही गुडेकर, चेयरमेन प्रभाकर कोरगावकर, संदिप मेस्त्री,रामु विखाले, स्वप्निल चिंदरकर, राजू राठोड, विनायक मेस्त्री,सचिन बांदिवडेकर, ड़ॉ वैशाली कोरगावकर, सुहासिनी कांबळी, हेलन कांबळे, नीळकंठ हजारे, धनश्री मेस्त्री, विलास गुडेकर, अनूप वारंग, निसार शेख, सुशांत राऊळ, अनंत हजारे,जीतू कांबळे,परेश कांबळी, प्रसाद कोरगावकर, बाळा चिंदरकर, संदिप कदम आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स