ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण यांनी माध्यमिक विद्यामंदिर साळशीत 'मातृ पितृ देवो भव:' चा दिला संदेश.

पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण यांनी माध्यमिक विद्यामंदिर साळशीत 'मातृ पितृ देवो भव:' चा दिला संदेश.

प्रकाशन: 11 Mar 2023 01:08 PM
वाचन संख्या 497

आई-वडिलांना वृद्धाश्रमात जायची वेळ येईल असे वागणे टाळायचे केले विशेष मार्गदर्शन.

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडचे पोलीस उपनिरीक्षक तथा नाट्यलेखक, दिग्दर्शक दशरथ चव्हाण यांनी साळशी हायस्कूल येथे ‘मातृ पितृ देवो भव:’ चा विशेष संदेश दिला. आपले आचार विचार स्वच्छ ठेवा. नेहमी चांगले कर्म करा. कारण आपले कर्मच शेवटपर्यंत आपल्या सोबत रहाते. आपले आईवडील हेच आपले विठठल रखुमाई आहेत. त्यांचे सेवा करा. त्यांना कधीच कमी लेखू नका. तुम्ही कितीही मोठे झालात तरी आपल्या आईवडिलांना चुकूनही वृद्धाश्रमात पाठवू नका. त्यांच्या भावना जपा.त्यांना सन्मानाने वागवा. असे प्रतिपादन देवगड पोलीस उपनिरीक्षक तथा नाट्यलेखक, दिग्दर्शक दशरथ चव्हाण यांनी साळशी हायस्कूल येथे बोलताना व्यक्त केले.

माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे शनि. दि. ११ मार्च ला ” मुलांचा मोबाईल वापर व आईवडिलांशी सुसंवाद, प्रेम व भविष्यात आपण कोण बनणार?” या विषयावर मुलांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री चव्हाण बोलत होते. ते पुढे म्हणाले की, प्रेम करताना ते निस्सीम असावे. चांगल्या भावना मनात ठेवा. मन प्रसन्न ठेवा. एकमेकांविषयी आदरभाव ठेवा. मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी करा. त्याचा दुरुपयोग करू नका. आय एस, आय पी एस. होण्यासाठी मुलांनी जरूर प्रयत्न करा. या परीक्षा देण्यासाठी जी जी पुस्तके लागतील ती मी स्वतःच्या खर्चाने देण्यास तयार आहे. जी कुणी मुले या परीक्षेसाठी इच्छुक असतील त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा असेही यावेळी देवगड पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण यांनी बोलताना सांगितले.

यावेळी संस्था चेअरमन सत्यवान सावंत, चाफेडचे माजी सरपंच सत्यवान भोगले, मुख्याध्यापक माणिक वंजारे, संस्था सदस्य संतोष आत्माराम साळसकर, संतोष दत्ताराम साळसकर, शिक्षक संजय मराठे, पुरुषोत्तम साटम, स्वप्नील भरणकर, साळशी पोस्टमन स्वप्नील तेली आदींसह शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार पुरुषोत्तम साटम यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स