ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत जि. प .शाळा तरंदळे नंबर १ चा कबड्डी संघ ठरला उपविजेता

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत जि. प .शाळा तरंदळे नंबर १ चा कबड्डी संघ ठरला उपविजेता

प्रकाशन: 07 Mar 2023 12:15 PM
वाचन संख्या 64

संतोष साळसकर | सहसंपादक : जिल्हा स्तरीय बाल, क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धा नुकतीच संपन्न झाली या स्पर्धेत लहान गट मुली कबड्डी यामध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तरंदळे नंबर १ च्या संघाने उपविजेतेपद पटकावून शाळेचे नाव जिल्हा स्तरावर पोहोचविले . या उज्वल यशाबद्दल नुकताच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सन्माननीय जयसिंग नाईक यांच्या शुभहस्ते विजेत्या संघाचा सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी सरपंच सुशिल कदम , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमाकांत देवलकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ.रसिका घाडीगावकर, माजी सरपंच सुधीर सावंत, ग्रामपंचायत सदस्य तेजस सावंत, निखिल घाडीगावकर, क्रीडा प्रेमी शरद सावंत, गणेश मुंबरकर , अभय सावंत, संतोष कदम,सौ.विनिता कदम, सर्व सन्माननीय शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुलांच्या या उत्कृष्ट कामगिरी साठी मार्गदर्शन करणाऱ्या मुख्याध्यापिका सौ.शुभलक्ष्मी कुळकर्णी, पदवीधर शिक्षक चंद्रशेखर पोकळे, उपशिक्षक उमाकांत होनराव, रामचंद्र डोईफोडे, मंगेश तळदेवकर आणि क्रीडा प्रेमी युवक, विद्यार्थी ,पालक वर्ग या सर्वांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स