ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी येथे लाठीकाठी प्राथमिक प्रशिक्षण शिबीर संपन्न...!
दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग व नाथ गोसावी युवक मंडळ चिंदर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन.
ब्युरो चिफ-विवेक परब- मालवण तालुक्यातील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग व नाथ गोसावी युवक मंडळ चिंदर यांच्या संयुक्त विद्यमाने लाठीकाठी प्राथमिक प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले.
लाठी काठी प्रशिक्षणात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायंगणी नं १, वायंगणी हायस्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हडी नं १, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हडी नं २, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडवळी वरची शाळेतील ९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या शिबिराच्या उद्घाटन कार्यमाच्यावेळी नाथ गोसावी युवक मंडळ चिंदर सडेवाडीचे अध्यक्ष योगेश गंगाराम गोसावी, सचिव मंगेश विजय गोसावी, उपाध्यक्ष पांडूरंग विनायक गोसावी, खजिनदार हेमंत सिताराम गोसावी, प्रमोद तुकाराम गोसावी, संतोष सिताराम गोसावी, मोरेश्वर विजय गोसावी, स्वप्नील सुर्यकांत गोसावी, मार्गदर्शक किशोर सरनोबत विशाल गोलतकर, आणि यशवंत पाटील तसेच प्रशालेचे शिक्षक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)