देवगड तालुक्यातील पडेल ग्रामपंचायत सरपंच भूषण पोकळे यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
महिलांसाठी होम मिनिस्टर,पाककला स्पर्धा,संगीत खुर्ची स्पर्धा तर मुलींसाठी रस्सी खेच स्पर्धा,शालेय निबंध स्पर्धा
१ लाख १० हजार कन्यारत्न पुरस्कार (३४ लाभार्थी ) वितरण तर बक्षिसे व विविध क्षेत्रातीत महिलांचा सन्मान,
संतोष साळसकर | सहसंपादक: पडेल ग्रामपंचायत सरपंच भूषण रामदास पोकळे यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनानिमित्त बुधवार ८ मार्च रोजी सायंकाळी ४ वा.ते ९ वा या वेळेत पडेल येथील श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पटांगण येथे महिलांसाठी विविध स्पर्धा व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, .पडेल ग्रामपंचायत सरपंच भूषण पोकळे यांच्या संकल्पनेतून १५ वा वित्त आयोगातून महिला व बालकल्याण योजने अंतर्गत बालस्नेही गाव संकल्पनेतून कन्यारत्नांच्या भविष्य निर्माण निधी योजनेतून १ लाख १० हजार कन्यारत्न पुरस्कार (३४ कन्यारत्न ना) वितरण करण्यात येणार आहे, .प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा अधिकारी स्वाती देसाई, .पडेल मंडळ अधिकारी रेश्मा कडुलकर, .डॉ. अर्चना किरण मराठे (देवगड ) .डॉ. पूजा मालपेकर,(पडेल ) .आदी उपस्थित राहणार आहेत, .पडेल गावातील विविध क्षेत्रातील महिला उद्योजक डॉक्टर, वकील,अंगणवाडी सेविका,आशा सेविका,नर्स, .पडेल महिला माजी सरपंच /उपसरपंच आदींचा सन्मान करण्यात येणार आहे, .३ ते ९ शालेय विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धा .बक्षिसे व प्रशस्ती पत्र, .महिलांसाठी होम मिनिस्टर-पैठणी व इतर बक्षिसे व प्रशस्ती पत्र, .पाककला स्पर्धा-बक्षिसे व प्रशस्ती पत्र, .मुलींसाठी रस्सी खेच स्पर्धा-बक्षिसे व प्रशस्ती पत्र, .सर्व महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा-बक्षिसे व प्रशस्ती पत्र, .आदी कार्यक्रमांचे आयोजन .करण्यात आले आहे,पडेल गावातील सर्व महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन पडेल ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी यांनी केले आहे, .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)