ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवलीतील विद्यार्थ्यांना देण्यात आली "ऐतिहासिक वस्तूंची माहिती"
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कणकवलीतील विद्यार्थ्यांना देण्यात आली "ऐतिहासिक वस्तूंची माहिती"

प्रकाशन: 24 Feb 2023 05:55 PM
वाचन संख्या 41

छत्रपती शिवाजी महाराजांचे वस्तुसंग्रालय – कणकवलीत विद्यामंदिर च्या पटांगणावर

ब्यूरो चिफ- विवेक परब- विद्यामंदिरच्या भव्य पटांगणावर मुंबई येथील “म्युझियम ऑन व्हील्स” छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह असलेली बस फेरी कुडाळ मालवण व कणकवली तालुक्यातील शाळांमध्ये आयोजित करावी अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथील छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाकडे केली होती. आ. वैभव नाईक यांच्या खास मागणीनुसार वस्तू संग्रहालयाची बस फेरी आज कणकवली तालुक्यातील शाळांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. आज हि बस कणकवली शहरातील विद्यामंदिर हायस्कूल च्या पटांगणावर दाखल झाली. या प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कांबळे सर, वणवे सर, राणे सर, नगरसेवक रुपेश नार्वेकर, प्रदीप मसूरकर, सुजित जाधव, सचिन आचरेकर, प्रसाद चव्हाण, महेश राणे यांनी बसचे स्वागत केले.एका मागणीवरून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाने बस पाठवून सहकार्य केले त्याबद्दल आ. वैभव नाईक यांनी त्यांचे आभार मानले. तसेच आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हि संधी उपलब्ध झाली त्याबद्दल या स्तुत्य उपक्रमाचे शिक्षक व पालकांनी कौतुक केले.

विद्यमंदिर हायस्कुलच्या भव्य पटांगणावर विद्यार्थ्यांना “म्युझियम ऑन व्हील्स” टीमने प्राचीन आणि ऐतिहासिक वस्तूंची माहिती दिली.तसेच विद्यार्थ्यांना बसमध्ये संग्रहित असलेल्या वस्तू प्रत्यक्षात दाखवण्यात आल्या.शिवकालीन नाणी, दगडी हत्यारे, बाहुबली प्रतिकृती, कोल्हापुरी साज, लघुचित्र, चाकावरील पक्षाची मृण्मुर्ती, चंद्रगुप्त दुसरे यांचे नाणे,नक्षीदार वस्त्र अशा अनेक प्राचीन वस्तूंचा यात समावेश होता.हे सर्व पाहत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमलला होता.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स