ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवणात मनसेच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन ; मनसे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवणात मनसेच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन ; मनसे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांचे आयोजन.

प्रकाशन: 11 Feb 2023 11:16 PM
वाचन संख्या 341

तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी व महिलांनी या विशेष आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे विशाल ओटवणेकर यांचे आवाहन.

मालवण | प्रतिनिधी : सध्याच्या सर्वसामान्य माणसांच्या विविध आरोग्यविषयक समस्या लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ तथा मनसे मार्फत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १४ फेब्रुवारीला मामा वरेरककर नाट्यगृह, मालवण येथे सकाळी १० ते ४ असे हे शिबिर संपन्न होणार आहे.

या शिबिरामध्ये ऑटोस्कोपी, पित्ताशय, स्वादुपिंड, मूत्रपिंड फुफ्फुस, मेंदूच्या रक्तवाहिन्या, हाडांचे विकार,हाड खनिज घनता, लहान हाडांचे विकार, हाडांचे आरोग्य, ह्यूमन टॉक्सिन, एसीजी रिपोर्ट, ब्लड शुगर, मिनरल्स, जीवनसत्व, अॅमिनो ॲसिड, को ऐंझाइमस्, अंत: स्त्राव प्रणाली, रोगप्रतिकारक प्रणाली, रक्तातील हेवी मेटल, लठ्ठपणा, ॲलर्जी, त्वचा व त्वचे संबंधित घटक शरीर रचना विश्लेषण, चॅनेल्स आणि कोलेस्ट्रॉल्स, रक्तातील चरबीचे प्रमाण मोठे आतड्यांचे आरोग्य, थायरॉईड कार्यक्षमता, पल्स ऑक्सिमीटर ट्रेस मिनरल, स्त्रियांकरता गायनेकोलॉजी, स्तनाचे विकार मासिक पाळी, बेसिक फिजिकल क्वालिटी, पांढऱ्या पेशी कॉलेजन मॅट्रिक्स, हृदय व मेंदूचा रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता, ऑपथाल्मोस्कोपी डोळ्यांचे आरोग्य याबाबतची तपासणी केली जाणार आहे.
मालवण तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी, महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मालवण मनसे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स