नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष गणेश ऊर्फ बंडू हर्णे यांच्या हस्ते सिद्धार्थवाडितील अंगणवाडीचे झाले उद्घाटन .
कणकवली नगरपंचायत मार्फत बांधण्यात आलेली अंगणवाडी ;अंगणवाडीसाठी जमीन दिलेले सिकंदर जाधव व त्यांच्या आई या कार्यक्रमाला उपस्थित.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतील नगरपंचायत मार्फत बांधण्यात आलेल्या अंगणवाडीचे उद्घाटन आज कणकवली नगरपंचायतचे नगराध्यक्ष समीर नलावडे व
उपनगराध्यक्ष गणेश ऊर्फ बंडू हर्णे यांच्या झाले. या उद्घाटन कार्यक्रमाला सिद्धार्थ वाडीतील सुनील हिंदळेकर व सिकंदर जाधव यांनी नगराध्यक्ष श्री.समीर नलावडे यांचे स्वागत केले. सौ.प्रतीक्षा कांबळे यांनी उपनगराध्यक्ष श्री.बंडू हर्णे यांचे स्वागत केले. अंगणवाडी सेविका सौ.सुर्वे बाई यांचे देखीव स्वागत करण्यात आले. यावेळी या अंगणवाडीचे सर्व विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.
माजी नगरसेवक श्री.गौतम खुडकर, श्री.आनंद जाधव, श्री.विश्वास कांबळे, श्री.महेंद्र जाधव, श्री.संदीप कांबळे, श्री.सतीश कांबळे, माजी नगरसेविका सौ.विशाखा कांबळे, नगरसेविका सौ.उर्मी जाधव व अंगणवाडीसाठी ज्यांनी जमीन दिली जमीन मालक श्री.सिकंदर जाधव व त्यांच्या आई या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
सिद्धार्थ वाडितील सर्व नागरिकांचीही या उद्घाटन प्रसंगी लक्षणीय उपस्थिती होती.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)