ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
‘कोरो इंडिया’तर्फे शिल्पकलेच्या माध्यमातून 'काळा घोडा फेस्टीवल २०२३' मध्ये संविधानाचा जागर.

‘कोरो इंडिया’तर्फे शिल्पकलेच्या माध्यमातून 'काळा घोडा फेस्टीवल २०२३' मध्ये संविधानाचा जागर.

प्रकाशन: 10 Feb 2023 11:54 AM
वाचन संख्या 70

कलाप्रदर्शनांपर्यंत पोहोचता येऊ न शकलेल्या व त्या वातावरणाचा अनुभव नसलेल्या कार्यकर्त्यांनी सामाजिक जाणीवांच्या जागरणासाठी आर्ट इंस्टॉलेशनसाठी दिली आहे यथाशक्ती वर्गणी.

मसुरे | प्रतिनिधी : मुंबईतील सुप्रसिद्ध ‘काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलमध्ये’ यंदा ‘कोरो इंडियाने’ प्रथमच आर्ट इंस्टॉलेशनसह सहभाग घेतला असून संविधानिक मूल्यांचा प्रसार करणारे एक मांडणीशिल्प चर्चगेट स्टेशनजवळील क्रॉस मैदानात सादर केले आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत हे मांडणीशिल्प पाहता येणार आहे. भारतीय समाजाचे वैविध्य, विविध समूहांचे प्रतिनिधित्व दाखवणारे हे आर्ट इंस्टॉलेशन ‘कोरो इंडिया’ आणि आर्टिस्ट सुमीत पाटील यांच्या संकल्पनेतून तयार केलेलं असून ते संविधानिक मूल्यांचे महत्व अधोरेखित करणारे आणि त्यावरील विश्वास दृढ करणारे आहे. या मांडणीशिल्पाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून हे फेस्टिवलचे मुख्य आकर्षण ठरत आहे. कलेच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने संविधानिक मूल्ये लोकांपर्यंत पोहोचत आहेत.

विविध कलाप्रदर्शनांपर्यंत ज्यांना कधी पोहोचता आले नाही, त्या वातावरणाचा अनुभव नसलेल्या तळातल्या कार्यकर्त्यांनी – या आर्ट इंस्टॉलेशनकरता जमेल ती वर्गणी दिली आहे हे ह्या मांडणीशिल्पाचे वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे तळातील आवाज कलेच्या माध्यमातून उमटू लागतो, तेव्हा बदलाचे पडसाद उमटतात. त्यामुळे जास्तीजास्त नागरिकांनी हे शिल्प पाहावे आणि येथील कार्यक्रमांत सहभाग घ्यावा असे आवाहन कोरो इंडियाने केले आहे.

कोरो इंडिया ही संस्था गेल्या ३३ वर्षांपासून सामाजिक समता, न्यायासाठी, संविधानिक मूल्यांसाठी ग्रासरुटवर काम करत आहे. यावर्षी कलेच्या माध्यमातून संविधानिक मूल्ये रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी कोरो इंडियाची टीमही काल घोडा आर्ट फेस्टिवलमध्ये उपस्थित राहून लोकांशी संवाद करत आहे. फेस्टिवल सुरु झाल्यापासून या मांडणीशिल्पाजवळ विविध कलाकारांनी समतेची गाणी सादर केली आहेत. युवकांनी संविधानावर आधारीत गीतावर समूहनृत्यही सादर केले आहे.

नागरिकांनी उत्स्फूर्तपणे विविध भाषांमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. भारतीय संविधान, त्यातील मूल्ये सर्जनशीलपणे अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावीत, हा यामागचा उद्देश आहे. ‘काळा घोडा’ आर्ट फेस्टिवलमधील संविधानावर आधारित हे मांडणीशिल्प सध्या कलाप्रेमींचे आकर्षण ठरते आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स