ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
त्या डंपर चालकावर कडक कायदेशीर कारवाई करा : आ. वैभव नाईक यांचे मालवण पोलीस निरिक्षकांना निर्देश.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

त्या डंपर चालकावर कडक कायदेशीर कारवाई करा : आ. वैभव नाईक यांचे मालवण पोलीस निरिक्षकांना निर्देश.

प्रकाशन: 10 Feb 2023 02:11 PM
वाचन संख्या 327

काळसे ग्रामस्थांसह आ.वैभव नाईक यांनी दिली मालवण पोलीस स्टेशनला भेट.

आ.वैभव नाईक यांनी अपघातातील दिवंगत रुक्मिणी काळसेकर कुटुंबीयांचे केले सांत्वन.

मालवण | सुयोग पंडित : काल ९ फेब्रुवारीच्या संध्याकाळी अख्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला हादरवलेल्या काळसे येथील डंपर अपघाताबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज सकाळी काळसे ग्रामस्थांसोबत मालवण पोलीस ठाण्याला भेट दिली. आमदार वैभव नाईक यांनी पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्याशी चर्चा करत डंपर चालक बाबू खुराशी याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. डंपरची कागदपत्रे तपासणी करायला सांगितले. या अपघातात डंपरखाली सापडून काळसे रमाईनगर येथील रुक्मिणी काळसेकर या मृत्युमुखी पडल्याने आमदार वैभव नाईक यांनी दुःख व्यक्त करत काळसेकर कुटुंबियांचे सांत्वन केले. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधत अपघात स्थळी स्पीड ब्रेकर बसविण्याचे निर्देश दिले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक व बांधकाम सभापती मंदार केणी, शहर प्रमुख बाबी जोगी, तपस्वी मयेकर आणि काळसे ग्रामस्थ उपस्थित होते.

काळसे होबळीचा माळ येथे काल ६.३० च्या सुमारास बेबंद वेगाने येणाऱ्या डंपरने शेतातून काम करून घरी परतत असलेल्या ५ महिलांना पाठीमागून धडक दिली. या धडकेत डंपरखाली सापडून रुक्मिणी पांडुरंग काळसेकर (५०, काळसे रमाईनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात रुक्मिणी यांच्या सोबत चालणार्या चार महिला देखील जबर जखमी झाल्या होत्या.जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स