ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शिरगांव येथील 'रिक्षा चालक- मालक संघाचा' १९ वा वर्धापनदिन सोहळा ११ फेब्रुवारीला ; विविध कार्यक्रमांचे आयोजन.

शिरगांव येथील 'रिक्षा चालक- मालक संघाचा' १९ वा वर्धापनदिन सोहळा ११ फेब्रुवारीला ; विविध कार्यक्रमांचे आयोजन.

प्रकाशन: 09 Feb 2023 09:08 PM
वाचन संख्या 126

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
देवगड तालुक्यातल्या शिरगांव येथील रिक्षा चालक मालक संघाचा १९ वा वर्धापनदिन सोहळा शनिवारी ११ फेब्रुवारीला मातोश्री कॉम्प्लेक्स, शिरगांव येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यादिवशी सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, ११ वाजता तीर्थप्रसाद ( सौजन्य – योगेश लोके ), दुपारी १२.३० ते २ वाजता महाप्रसाद ( सौजन्य – गणपत देसाई ), ३ ते ६ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू ( सौजन्य – दिपक तावडे ), ४ ते ७ वाजता खास महिलांसाठी “खेळ पैठणीचा” ( सौजन्य – संदीप साटम व हरिओम ग्रूप ), सायंकाळी ७ ते ८ वाजता स्थानिक भजने, रात्रौ ९.३० वाजता विद्यार्थी गुणगौरव समारंभ ( फुले व्यवस्थापन सौजन्य – राजेश फाटक, मुंबई ), रात्रौ १० वाजता बुवा समीर कदम ( श्री लिंग रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पोखरण, गुरुवर्य बुवा कै. काशिनाथ परब आणि सुशील पेडणेकर यांचे शिष्य, पखवाज – शुभम गावडे, तबला – युवराज कुर्ले, सौजन्य – नाद गावचे सरपंच प्रवीण पास्टे ) आणि बुवा प्रवीण सुतार ( विठठल रखुमाई भजन मंडळ, आजीवली सोनारवाडी, गुरुवर्य बुवा – अजित मुळम यांचे शिष्य, पखवाज – बंटी मुळम, सौजन्य – शिरगांव – शेवरे ग्रूप ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमित साटम ) यांच्यात डबलबारी आमने सामने भजनाचा जंगी सामना रंगणार आहे. तरी या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहून या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन शिरगाव रिक्षा चालक मालक संघाचे अध्यक्ष तारक चव्हाण, उपाध्यक्ष सूर्यकांत ( भाई ) तावडे, सचिव महेश ओंबळकर, खजिनदार संतोष जंगले आणि सर्व सदस्यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स