ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
किर्लोस येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया प्रतिपूर्ती कार्यशाळा संपन्न ; मालवण तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

किर्लोस येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया प्रतिपूर्ती कार्यशाळा संपन्न ; मालवण तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजन.

प्रकाशन: 09 Feb 2023 09:40 PM
वाचन संख्या 71

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण यांच्यावतीने किर्लोस येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया प्रतिपूर्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रमा अंतर्गत महिलांसाठी पाककृती स्पर्धा घेण्यात आली. वीस महिलांनी सहभाग दर्शविला. त्याच प्रमाणे महिला कर्मचारी यांनीही पाककृती कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विलास सावंत, शास्त्रज्ञ विवेक सावंत उपस्थित होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावि, सरपंच म.साक्षी चव्हाण सरपंच, माजी सरपंच प्रदीप सावंत, मंडळ कृषी अधिकारी .अतुल कांबळे, कृषी अधिकारी दिनेश लंबे, कृषी पर्यवेक्षक धनंजय गावडे, कृषी पर्यवेक्षक एस जी परब, कृषी पर्यवेक्षक डी के सावंत, म. अमृता भोगले, म सुषमा धामापूरकर, म. मनीषा गीते, म.विध्या कुबल, म.स्नेहा चौखंडे, पवन सांगडे, सुशील कुमार शिंदे, अश्विन कुरकुटे, सुनील कदम, सर्व कृषी सहाय्यक,ग्रामपंचात सदस्य, म.राणे मुख्याध्यापिका उपस्थित होते.


डॉक्टर विलास सावंत व विवेक सावंत भोसले यांनी पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्त्व व तृणधान्यांमध्ये असणारे विविध घटक यांचा सेवन केल्यामुळे शरीराला कसा फायदा होतो व शरीर कसे सुदृढ राहते रोग प्रतिकारक शक्ती कशी वाढते याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी शासनाच्या विविध योजना तळागाळातील घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी खेडोपाडी विविध कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांना त्याचा लाभ जास्तीत जास्त कसा घेता येईल याबाबत माहिती दिली. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी वर्गाने बचत गटांनी फायदा घेण्याचे आवाहन केले तसेच कृषी विभाग मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना महाडीबीटी पोर्टलवर कशा पद्धतीने आहेत याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रम नियोजन म. जिकमडे, डी के सावंत यांनी केले यावेळी प्रधानमंत्री शुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना बाबत . अतुल कांबळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले दिनेश लंबे यांनी प्रास्ताविक केले. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित पाककला कृतीमध्ये सहभाग ही घेतलेल्या महिलांना अनुक्रमे एक दोन तीन व उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डी के सावंत यांनी केले

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स