ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मुणगे हायस्कुलचे शिक्षक एन. जी. वीरकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाकडून गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मुणगे हायस्कुलचे शिक्षक एन. जी. वीरकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाकडून गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान.

प्रकाशन: 09 Feb 2023 04:28 PM
वाचन संख्या 112

नवनिर्वाचित शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची पुरस्कार कार्यक्रमाला विशेष उपस्थिती.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत दिला जाणारा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कुलचे शिक्षक एन. जी. वीरकर यांना नुकताच देवगड तालुक्यातल्या वाडा गावातील अनंत केळकर हायस्कूल येथे प्रदान करण्यात आला.

यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे , महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळाचे कार्यवाह शिवशरण बिराजदार ,प्रवीण आंबोळे, डॉक्टर दीपक शेटे, सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ
अध्यक्ष वामनराव खोत, तुकाराम पेडणेकर, औदुंबर भागवत ,अनंत केळकर हायस्कूल वाडा चे मुख्याध्यापक नारायण माने , मालवण तालुका गणित अध्यापक मंडळ अध्यक्ष प्रसाद कुबल आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

सिंधुदुर्ग गणित अध्यापक मंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणित संबोध , प्राविण्य , गणित प्राज्ञ परीक्षा अशा अनेक परीक्षा यशस्वीपणे आयोजित केल्या जातात आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार केला जातो .शिक्षकांसाठी चर्चा सत्रे, शिबिरे आयोजित केली जातात . उपक्रमशील गणित शिक्षक ,उपक्रमशील मुख्याध्यापक अशा प्रकारे गणित विषयासाठी कार्यशील असणाऱ्यांचा बहुमान गणित मंडळांच्या वतीने करण्यात येतो. एन जी वीरकर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री भगवती एज्युकेशन सोसायटी मुणगे आजी, माजी पदाधिकारी, सहकारी शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी , पालक यांच्याकडून अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स