कणकवलीत आता १ रुपयांत १ लीटर शुद्ध पाणी…!
रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या वतीने कणकवलीत वाॅटर ए.टी.एम. ची सोय.
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी भेटून केले विशेष अभिनंदन.
विवेक परब | ब्युरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्या वतीने कणकवलीतील नागरिकांसाठी ‘वाॅटर ए.टी.एम.’ ची अभिनव सुविधा आज पासून कणकवली तहसीलदार कार्यालय येथे उपलब्ध करण्यात आली आहे. आता कणकवलीतील सर्व नागरिकांसाठी फक्त १ रुपयात एक लिटर स्वच्छ व शुद्ध पाणी मिळणार आहे. या ए.टी एम. मध्ये १ रुपया टाकून एक लिटर पाण्याचा लाभ आजपासून कणकवली वासियांना घेता येणार आहे.
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर सोबत मानसी मुंज यांनी रोटरी क्लब ऑफ कणकवली चे डॉ. विद्याधर तायशेटे व दिपक अंधारी यांचे केले भेटून अभिनंदन. कणकवली शहरासाठी ही उपयुक्त सोय करुन दिल्याबद्दल रोटरी क्लबचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. या उपलब्ध ‘वाॅटर ए.टी.एम.सोयीचा’ चा फायदा शहरातील सर्व सामान्य जनतेला होईल हेही प्रशंसनीय असल्याचे युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी यावेळी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)