ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते नामवंत साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांचा सत्कार.

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते नामवंत साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांचा सत्कार.

प्रकाशन: 09 Feb 2023 01:19 PM
वाचन संख्या 74

प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीला नुकताच साहित्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार झाला आहे प्राप्त

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीला नुकताच साहित्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. या निमीत्ताने कणकवली नगर वाचनालय येथे आयोजित केलेल्या त्यांच्या नागरी सत्कार सोहळ्याला कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून प्रा. प्रवीण बांदेकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी नागरी सत्कार सोहळ्याला माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲड. रमाकांत खलप (गोवा),इन गोवा २४×७ चे संपादक प्रभाकर ढगे, मराठीतील महत्त्वाचे कवी वीरधवल परब, कवी समीक्षक प्रा. डॉ.गोविंद काजरेकर, प्रा.डाॅ. शरयू आसोलकर, कवी अनिल धाकू कांबळी, कवी मोहन कुंभार , अखंड लोकमंच कणकवलीचे नामानंद मोडक, नाटककार शफाअत ख़ान व इतर मान्यवर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स