रामलीला सुपर मार्केटला लवकरच भव्य स्वरुप येणार : जिल्हा बॅन्क संचालक बाबा परब.
मालवणात रामलीला सुपर मार्केटचे शानदार उद्घाटन.
मालवण | सुयोग पंडित : मालवणात धुरीवाडा येथे बोर्डिंग ग्राऊंड जवळ रामलीला सुपर मार्केटचे आज जिल्हा व्यापारी संघाचे कोषाध्यक्ष श्री अरविंद नेवाळकर यांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून उद्घाटन झाले . मालवणातील माजी क्रिकेट पटूंची संकल्पना असलेल्या या सुपर मार्केटच्या उद्घाटन कार्यक्रमाला ज्येष्ठ माजी खेळाडू श्री भाऊ हडकर, सिंधुदुर्ग जिल्हा बॅन्क संचालक बाबा परब, माजी पं.स.सभापती अनिल निव्हेकर, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके, मालवण स्पोर्टस् असोसिएशनच्या श्रीमती अंजली हडकर , व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष नितीन तायशेट्ये, ज्येष्ठ व्यापारी मसूद मेमन , पाटकर स्टेशनरीजचे मालक श्री पाटकर, श्री विक्रम मोरे, माजी यष्टिरक्षक खेळाडू रामचंद्र शेटये यजुवेंद्र हडकर, विनीत मंडलीक, आप्पा मालंडकर, जितू वाळके, बाबल डिसोजा , आशीष पेडणेकर, बबन रेडकर, नंदू देसाई,पपू परब, सुपर मार्केटचे कर्मचारी , क्रिडा तज्ञ व शिक्षक श्री पराडकर , पंच व खेळाडू दीपक धुरी, महेश काळसेकर आणि मालवणच्या क्रिडा व व्यापार क्षेत्रातील अनेक नामवंत व नागरिक यावेळी उपस्थित होते.
यावेळी मालवणचे ज्येष्ठ दिवंगत खेळाडू श्री लीलाधर हडकर आणि श्री दीपक उर्फ मालक मयेकर यांच्या स्मृतींनाही उजाळा देत वंदन करण्यात आले.
यावेळी सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी या रामलीला सुपर मार्केटच्या संकल्पनेची प्रशंसा केली आणि शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅन्क संचालक बाबा परब यांनी सांगितले की आज या माजी खेळाडूंनी सुरू केलेला रामलीला सुपरमार्केटचा प्रकल्प लवकरच भव्य व व्यापक स्वरुपात पहायला मिळेल कारण यात सामील असणारे सर्व क्षेत्रातील प्रामाणिकपणे कार्य करणारे संदस्य हे आजपर्यंत संपन्न केलेले सर्व प्रकल्प यशस्वीपणे करत आलेले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)