ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
फणसगांवचे सुपुत्र शशिकांत शांताराम नारकर यांची सैन्यदलात 'सुभेदार मेजर' पदावर बढती सह नियुक्ती.

फणसगांवचे सुपुत्र शशिकांत शांताराम नारकर यांची सैन्यदलात 'सुभेदार मेजर' पदावर बढती सह नियुक्ती.

प्रकाशन: 02 Feb 2023 09:43 PM
वाचन संख्या 101

कणकवली काॅलेजचे माजी विद्यार्थी आहेत सुभेदार मेजर शशिकांत नारकर.

संतोष साळसकर | सहसंपादक : भारतीय थलसेना तथा आर्मीमध्ये गेली २६ वर्षे सेवा बजावत असताना जिद्द,चिकाटी आणि महत्वकांक्षेच्या जोरावर कार्यरत असणारे कणकवली काॅलेजचे माजी विद्यार्थी आणि देवगड तालुक्यातील फणसगांवचे सुपूत्र तसेच मैत्री परिवारातील सदस्य शशिकांत शांताराम नारकर यांची १ फेब्रुवारी २०२३ ला ‘सुभेदार मेजर’ पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे.

सुभेदार मेजर शशिकांत नारकर यांची गेल्या २६ वर्षातील सैन्यातील सेवेची कारकीर्द ही उल्लेखनीय कामगिरी बजावणारी ठरली आहे. काॅलेजमध्ये असल्यापासूनच त्यांना सैन्यदलात सेवा बजावायची तीव्र इच्छा होते. एन सी सी चे विद्यार्थी असल्याने सैन्यात भर्ती होऊन देशाच्या सीमेचे रक्षण करण्याची महत्वाकांक्षा त्यांनी बाळगली होती आणि ती सत्यातही उतरवली.

बी.काॅम नंतर शशिकांत लगेच आर्मीमध्ये जवान म्हणून भर्ती झाले. क्लार्क पदापासून सुरू झालेला त्याचा प्रवास थक्क करणारा असा आहे. नंतर आर्मीमध्ये स्टोअर किपर होते आणि त्यानंतर बी काॅम पर्यंत शिक्षण असल्यामुळे आर्मीमध्ये असलेल्या पुढील जबाबदाऱ्या त्यांना खुणावत होत्या.

आसाम येथून ट्रेनिंग घेऊन बाहेर पडल्यावर त्यांच्या आर्मीमध्ये पुढचा प्रवास सुरू झाला.एंटरन्स एक्झामनंतर उत्तराखंड रुडकी येथे कार्यरत झाले.बंगाल व पंजाब जालंधर येथे इंजिनिअर होण्यासाठीचे तीन वर्षाचे शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर पंजाब-जालंधर,नागालँड येथे सिव्हिल इंजिनियर म्हणून कार्यरत झाले.त्यानंतर पुढील यशाची शिखरे गाठण्यासाठीची यशस्वी वाटचाल सुरू झाली. गुजरात गांधीनगर येथे एअरफोर्स मध्ये काही काळ कामगिरी बजावली. त्यानंतर हवालदार पदावरती प्रमोशन मिळाले. पुढे देखील त्यांचा ट्रेनिंगचा ओघ सुरुच होता. नंतर पठाणकोठ येथे तीन वर्षे नायब सुभेदार म्हणून कामगिरी बजावली.मग पुढील प्रमोशन मिळाले आणि जम्मू काश्मीरला सुभेदार म्हणून नियुक्ती झाली. आर्मीमध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून यशस्वी कारकीर्द सुरू झाल्यावरती १ फेब्रुवारी रोजी पहिल्याच दिवशी आणखीन एका प्रमोशनची भर पडून सुभेदार मेजर ही बढती त्यांना मिळाली आहे.
त्यांच्या आर्मीच्या युनिफॉर्मच्या खांद्यावरील स्टारमध्ये आणखीन एका स्टारची भर पडली आहे.सध्या ते हिमाचल प्रदेश येथील ‘योल’ येथे आर्मीमध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत.

कणकवली काॅलेजमधील सन १९९५-९६ सालातील बी.काॅम बॅचच्या मैत्री परिवारातील सदस्य असलेले शशिकांत नारकर यांच्या सारखे शांत स्वभावाचे तसेच जिद्द, मेहनती आणि देश सेवेसाठी आर्मीमध्ये भरती झाल्यावरती सोल्जर पदापासून ‘सुभेदार मेजर’ या पदापर्यंत अथक परिश्रमाने पोहचले आहेत ही बाब निश्चितच अभिमानास्पद व गौरवास्पद आहे असेच त्यांच्या
मैत्री परिवारातील सर्व सदस्यांनी माध्यमांना सांगितले आहे. आपला मित्र शशिकांत नारकर “सुभेदार मेजर” या पदापर्यंत मजल मारून पोहचला या गोष्टीचा आनंदोत्सव साजरा केला आणि त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव केला. कणकवली काॅलेजचा माजी विद्यार्थी ‘सुभेदार मेजर’ या पदापर्यंत पोहचला ही घटना काॅलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवून सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखीच आहे आणि देवगड तालुक्यातील फणसगांव व विठ्ठलादेवी गावच्या ग्रामस्थांच्या दृष्टीने अभिमानास्पद आणि उर भरुन आणणारी म्हणावी लागेल असेच त्यांच्या गावातून व स्थानिक वर्तुळातून कौतुक होत आहे.

विठ्ठलादेवी गावचे सरपंच दिनेश नारकर यांचे सुभेदार मेजर शशिकांत नारकर हे बंधू होत.तसेच फणसगांव येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांताराम नारकर यांचे ते चिरंजीव आहेत.या निवडी बद्दल फणसगांव पंचक्रोशीत आनंदाचे,उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. शशिकांत नारकर यांच्या उल्लेखनीय कार्याचा व कामगिरीचा सर्वच स्तरातून गौरव करण्यात येत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स