ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आंगणेवाडीतील बचत गटांच्या उत्पादीत मालाचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आ. नितेश राणे यांच्या हस्ते उद्या उद्घाटन.

आंगणेवाडीतील बचत गटांच्या उत्पादीत मालाचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आ. नितेश राणे यांच्या हस्ते उद्या उद्घाटन.

प्रकाशन: 02 Feb 2023 08:37 PM
वाचन संख्या 117

 
विवेक परब | ब्युरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे गांवच्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी जत्रोत्सवाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आंगणेवाडी येथील बचत गटांच्या उत्पादीत मालाचे प्रदर्शन व विक्री कार्येक्रमाचा शुभारंभ आमदार श्री.नितेश राणे यांच्या हस्ते उद्या शुक्रवार दि.३ फेब्रुवारीला संध्याकाळी ४ वाजता श्री देवी भराडी मंदिर नजिक करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा प्रबंधक नाबार्ड अजय थुटे, जिल्हा उपनिबंधक माणिक सांगळे, आंगणेवाडी विकास समिती अध्यश भास्कर आंगणे, मसुरे सरपंच संदिप हडकर, देऊळवाडा सरपंच नरेंद्र सावंत, उमेदचे वैभव पवार, महिला विकास आर्थिक महामंडळ समन्वय अधिकारी नितीन काळे, श्रीम. मानसी पालव सरपंच ग्रामपंचायत बिळवस आंगणेवाडी, बँक संचालक संदिप परब, व्हिक्टर डान्टस, मेघनाथ धुरी, जिल्हा बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे असे मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
या शुभारंभ सोहळ्याला मोठ्या संख्येने आंगणेवाडी व देउळवाडा गावच्या ग्रामस्थांनी तसेच यात्रेस आलेल्या भाविकांनी व जिल्हा बँकेचे तालुक्यातील विकास अधिकारी, कर्मचारी यांनी सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.

या बचत गटांच्या उत्पादीत मालाचे प्रदर्शन व विक्री दि.३ ते ०५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स