ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मडुरा हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. दशरथ घाडी यांचा सत्कार.

मडुरा हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. दशरथ घाडी यांचा सत्कार.

प्रकाशन: 02 Feb 2023 10:18 PM
वाचन संख्या 269

पद्मावती स्वयंम सहाय्यता समुहाच्या अध्यक्षा सौ.अस्मिता घाडी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

बांदा | राकेश परब : ग्रामीण भागातून शिक्षण घेऊनच आज या पदापर्यंत पोहचलो. ३२ वर्षाच्या प्रदिर्घ कालावधी नंतर मुख्याध्यापक या पदावर काम करून सेवानिवृत्त झालो. आज आपल्या घराच्या माणसांकडून झालेल्या सत्कारामुळे आपण भारावून गेलो आहोत व या शिक्षण क्षेत्रात यशस्वी होण्यामागे आपल्या सुविद्य पत्नीचावतदा सौभाग्यवतीचा मोठा वाटा असल्याचे मडुरे हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री दशरथ घाडी यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले.
श्री दशरथ घाडी यांचा सत्कार कार्यक्रम व सौ.अस्मिता घाडी यांचा वाढदिवस असा एकत्रित कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.


       
यावेळी व्यासपीठावर  सरपंच बांदा सौ.प्रियांका नाईक, उपसरपंच बांदा जावेद ख़तिब, माजी जि.प.सदस्या सौ. श्वेता कोरगांवकर, माजी सरपंच दिपक सावंत, संदिप बांदेकर, अभय सातार्डेकर, राजाराम म्हावळणकर, माजी ग्रा.पं सदस्यां ,सौ.अनुजा सातार्डेकर, सौ.लक्ष्मी सावंत, गुरूनाथ सावंत, उपस्थित होते.
      
यावेळी श्री.दशरथ घाडी यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच पद्मावती स्वयंम सहाय्यता समुह च्या अध्यक्षा सौ.अस्मिता घाडी यांचा वाढदिवस सुद्धा या मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यांना उपस्थित सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रविण कळगुंटकर, प्रमोद कळगुंटकर, म्हावळणकर, विठ्ठल कळगुंटकर, राकेश परब, उमेश झाट्ये, सुप्रभा गावडे, पूर्णलेखा म्हावळणकर, सोहम् सावंत, पार्थ, नेमण, शिवम् गावडे उपस्थीत होते. या अनोख्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी  डिंगणे सरपंच श्री. नाना सावंत तर आभार प्रमोद कळगुंटकर यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स