ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तंत्रस्नेही शिक्षक सतिश मुणगेकर राज्यस्तरीय उपक्रमशील पुरस्काराने गौरवीत.

तंत्रस्नेही शिक्षक सतिश मुणगेकर राज्यस्तरीय उपक्रमशील पुरस्काराने गौरवीत.

प्रकाशन: 24 Jan 2023 04:06 PM
वाचन संख्या 57

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मुणगे गावचे सुपुत्र व रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील जि. प. शाळा झोंबडी नंबर १ या प्रशालेचे तंत्रस्नेही शिक्षक सतिश पांडुरंग मुणगेकर याना नवी दिशा, नवे उपक्रम राज्य स्तरीय समूहातर्फे अभिनव उपक्रमांसाठी राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार २०२३ ने राष्ट्र सेवादलाचे निळू फुले सभागृह सानेगुरुजी स्मारक सिंहगड रोड पुणे येथे गोरवीत करण्यात आले.


राष्ट्र सेवादलाचे संचालक शिवाजी खाडेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सतीश मुणगेकर हे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य याचे संघटक आहेत तर आविष्कार फाऊंडेशन इंडीया तालुका शाखा गुहागर चे अध्यक्ष आहेत. त्यांना यापूर्वी राज्यस्तरीय पर्यावरण पूरक शिक्षक पुरस्कार २०१७ महाराष्ट्र राज्य, राज्यस्तरीय पर्यावरण मित्र शिक्षक पुरस्कार २०१९ महाराष्ट्र राज्य,राज्यस्तरीय क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२१, राष्ट्रीय स्मार्ट टीचर पुरस्कार २०२१-२२, शैक्षणिक व सामाजिक कार्यगौरव राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार http://localhost/news/public/uploads/2022, राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार २०२३ आदी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

राज्यातील उपक्रमशील शिक्षकांच्या ‘नवी दिशा नवे उपक्रम’ पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. नवी दिशा नवे उपक्रम या राज्यस्तरीय समुहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ५०उपक्रमशील शिक्षकांच्या नवी दिशा नवे उपक्रम या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व उपक्रमशील शिक्षकांचा गुणगौरव सोहळा झाला. देवराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी SCERT चे उपसंचालक मा.रमाकांत काठमौरे ,माजी उपसंचालक विकास गरूड,उपप्रशासकीय अधिकारी पुणे म.न.पा. शुभांगी चव्हाण, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर, विजय आवारे, शिवाजी खांडेकर संचालक राष्ट्र सेवा दल पुणे, सचिन डिंगळे, बाळकृष्ण चोरमले,ना.राजेश सुर्वे, सेवानिवृत्त शिक्षिका विजया महाडिक यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन झाले. पुरस्कार निवडी बद्दल सतीश मुणगेकर यांनी आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स