सिंधुदुर्ग जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी दयानंद दत्ताराम गवस.
विवेक परब | ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असोसिएशनची सर्वसाधारण सभा २३ जानेवारी रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.०० या वेळेत कसाल येथील श्रीसाई माऊली हॉल येथे असोसिएशनचे अध्यक्ष अर्जुन राणे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली . या सभेमध्ये मागील वर्षभराचा आढावा कार्यवाह अनिरुद्ध गावडे यांनी सादर केला. नंतर पुढील पाच वर्षांकरिता कार्यकारिणी निवडण्यात आली.
अध्यक्ष म्हणून दयानंद दत्ताराम गवस-सेवानिवृत्त डी. वाय. एस्. पी, उपाध्यक्ष सुरेंद्र सिताराम सकपाळ, विजय हरी कदम, गोविंद वासुदेव वारंग, यशवंत शंकर डिंगणेकर, सेक्रेटरी म्हणून अनिवृद्ध गंगाराम गावडे, सहसेक्रेटरी- सुरेश गुणाजी वारंग, महादेव रघुनाथ जाधव, खजिनदार म्हणून उमाकांत राजाराम पालव तसेच समिती सदस्य म्ई रमेश कृष्णा झमने, जयशंकर राजाराम धुरी, लक्ष्मण नारायण गवस, एकनाथ मुरलीधर मुसळे, सल्लागार म्हणून अर्जुन शंकर राणे यांची निवड झाली.
नविन अध्यक्षांसहीत कार्यकारिणीला माजी अध्यक्ष अर्जुन राणे यांनी शुभेच्छा दिल्या.
नविन अध्यक्षांनी मार्च १९ रोजी सर्व सभासदांसाठी सकाळच्या सत्रात मेडिकल कॅम्प व दुपारनंतर गेट टुगेदर कार्यक्रम घोषित केला व आपण सर्वांना घेऊन काम करणार आहे तरी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुरेंद्र सकपाळ यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)