ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
नारिंग्रे येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सन्मान वंदना.

नारिंग्रे येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सन्मान वंदना.

प्रकाशन: 23 Jan 2023 04:27 PM
वाचन संख्या 86

राणे विद्यामंदिर व दत्त विद्या मंदिर या शाळांमधील मुलांना केले खाऊचे वाटप.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या नारिंग्रे येथे हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती नारिंग्रे येथे उत्साहात पार पडली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास नारिंग्रे गावचे ग्रामस्थ, तसेच घाडीगांवकर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व देवगड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे विद्यमान सहकार समृद्धी पॅनलचे उमेदवार रघुवीर वायंगणकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व दीप प्रज्वलन करण्यात आले. तर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला युवासेना उपतालुकाप्रमुख मनोज भावे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी शिवसेना विभाग प्रमुख श्रीकांत गांवकर, युवासेना उपतालुकाप्रमुख मनोज भावे, शिवसेना शाखा क्रमांक ६० चे शाखाप्रमुख दीपक पवार, ग्रामपंचायत विद्यमान सदस्य अरुण कदम व सदस्या मृणाल गांवकर, माजी ग्रामपंचायत सदस्या विद्या बावकर, जयेश गांवकर, मंगेश घाडी, विलास शिंदे, राकेश कदम, घाडी तसेच ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.

या प्रसंगी नारिंग्रे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा आबासाहेब राणे विद्यामंदिर व दत्त विद्या मंदिर या शाळांमधील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी अनेक ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स