मालवण नगरपरीषदेत हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतीला अभिवादन.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरीषदेत , आज हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आज़ाद हिंद सेनेचे प्रणेते स्व.सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमांना, नगरपरीषद अधिकारी व कर्मचारी वृंदातर्फे पुष्पहार अर्पण करुन सन्मानपूर्वक अभिवादन करण्यात आले. सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी नगरपरीषद मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यासह शहर अभियंता सुधाकर पाटकर, मुख्य लिपिक महेश परब, अभियंता सोनाली हळदणकर, लेखापाल दिनेश राऊत, लिपिक रसिका कुलकर्णी, रचना सहाय्यक निलेश गाडगे, समन्वयक निलेश नाईक, शिपाई हेमंत आचरेकर, चालक रुपेश हडकर, निरिक्षक शिंदे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)