ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवली भागातील एअरटेल नेटवर्कची समस्या सुटणार.

कणकवली भागातील एअरटेल नेटवर्कची समस्या सुटणार.

प्रकाशन: 21 Jan 2023 10:26 PM
वाचन संख्या 61

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा यशस्वी पाठपुरावा.

विवेक परब | ब्युरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली बांधकरवाडीतल्या रेल्वेच्या हद्दीत असलेला एअरटेल चा टॉवर गेले काही दिवस बंद असल्याने कणकवली शहरातील कनकनगर, परबवाडी, बांधकरवाडी सह अन्य भागांमध्ये नेटवर्कचा मोठी समस्या निर्माण होत होती.

याबद्दल नगरसेवक सुशांत नाईक यांनी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधत तात्काळ टॉवर सुरू करण्याकरिता एअरटेल कंपनीशी संपर्क साधला होता. त्यानुसार रेल्वेच्या जमिनीत असलेला टॉवर दुसरीकडे स्थलांतरित करत असताना याकरिता एका खाजगी जागेचा करार देखील करण्यात आला आहे. परंतु टॉवर स्थलांतरित करण्यास थोडा अवधी जाणार असल्याने या कालावधीत तात्काळ ट्रक टॉवर उभारणी करण्याची मागणी श्री नाईक यांनी केली होती. त्यानुसार खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून एअरटेल चे व्यवस्थापक नुपूर मोर्ये यांच्याशी संपर्क साधून ट्रक टॉवर ची मागणी मान्य झाली आहे अशी माहिती विरोधी गटनेते, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली. या मागणी नंतर येत्या दोन दिवसात हा ट्रक टॉवर कणकवली बांधकरवाडीच्या ठिकाणी कार्यान्वित होणार असल्याचेही श्री. नाईक यांनी सांगितले. व त्यानंतर येथे महिन्याभरात एरटेल चा नवीन टॉवर स्थलांतरित करून कार्यान्वित होईल असेही त्यांनी सांगितले. यामुळे या भागातील नागरिकांनी एअरटेल नेटवर्क ची समस्या सुटणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स