ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
'बालभारती ते बालबाजार..' जि. प. प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडीची अनोखी उपक्रम झेप...!

'बालभारती ते बालबाजार..' जि. प. प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडीची अनोखी उपक्रम झेप...!

प्रकाशन: 22 Jan 2023 06:37 AM
वाचन संख्या 297

बालवयातूनच उद्योग व्यवसाय व्यवस्थापनाची ओळख करुन देणारा सर्वांगीण ‘पोषक प्रकल्प..!’

विवेक परब | ब्यूरो चीफ :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या जि. प. प्राथमिक शाळा, चिंदर सडेवाडी ही शाळा वैशिष्ट्यपूर्ण वार्षिक उपक्रम साजरी करत असते. त्यामधील एक उपक्रम म्हणजे शालेय मुलांचा बाल बाजार. काल २१ जानेवारीला हा बाल बाजार भरवला गेला.

आजच्या या बाजारात शाळेच्या परस बागेत मुलांनी पिकविलेल्या विविध भाज्या जसे लाल भाजी, मुळा भाजी, कोथिंबीर, अळू, वांगी, टोमॅटो, नवलकोल, नारळ, कणगे तसेच पोहे, कोबी वडे, गुलाबजाम, कोकणातील प्रसिद्ध खाद्य पदार्थ अजून बरेच काही वस्तू, पदार्थ यांची दुकाने लागली होती.

या बाल बाजाराचा मुख्य उद्देश मुलांना प्रत्यक्ष व्यवहार ज्ञानाचे धडे मिळतील, बाजार ही संकल्पना समजेल, आपल्या मालाच्या विक्रीसाठी त्याची जाहिरात कशी करावी याचा अनुभव यावा या उद्देशाने हा बाल बाजार उपक्रम घेण्यात आला. बालवयातूनच उद्योग व्यवसाय व्यवस्थापनाची ओळख करुन देणारा सर्वांगीण ‘पोषक प्रकल्प असाच या प्रकल्पाचा उद्देश आहे. ‘बालभारती ते बालबाजार’असेही या प्रकल्पाचे वर्णन होऊ शकते. पुस्तकी ज्ञानाचा योग्य व थेट उपयोगाचा अनुभव आणि दोन्ही ज्ञानांतून निर्माण होणारी युवापिढी सक्षमीकरण असे एक वेगळे उद्दिष्ट या प्रकल्पात दिसून आले.

आजच्या या बाल बाजार प्रसंगी प्रसिध्द उद्योजक प्रकाश मेस्त्री, माजी ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र हडकर, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ शिवानी हडकर, विद्यमान अध्यक्ष सौ श्रद्धा सुर्वे, उपाध्यक्ष किरण कांबळी, सतीश हडकर तसेच अनेक व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. बाल बाजाराचे उद्घाटन सतीश हडकर यांच्या हस्ते करण्यात आले. चिंदर सडेवाडीतील ांनी खरेदीसाठी भरगोस प्रतिसाद देऊन सदर उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यास मोलाचे सहकार्य केले.
या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक यशवंत पाटील व आभार संभाजी पवार यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स